Goa Tourism: जानेवारी, फेब्रुवारीत पर्यटक 'फुल्ल'! मार्चला 'युद्धा'चा फटका; गतवर्षीच्या तुलनेत पहिल्‍या तिमाहीत 32,500 पर्यटकांची वाढ

Goa tourism Q1 2026 statistics: गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा सुरुवातीच्‍या जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्‍यांत राज्‍यात येणाऱ्या देशी–विदेशी पर्यटकांत सुमारे ३२,५०० नी वाढ झाली.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा सुरुवातीच्‍या जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्‍यांत राज्‍यात येणाऱ्या देशी–विदेशी पर्यटकांत सुमारे ३२,५०० नी वाढ झाली, परंतु, अमेरिका–इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे तयार झालेल्‍या समस्‍यांमुळे मार्चमधील पर्यटकांत मात्र घट झाल्‍याचे पर्यटन खात्‍याकडून प्राप्‍त झालेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्‍यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्‍यांत राज्‍यात देशी–विदेशी मिळून १९,६२,४५८ पर्यटक दाखल झालेले होते. यंदा या दोन महिन्‍यांत त्‍यात ३२,४९२ नी वाढ झाली असून या दोन महिन्‍यांत १९,९४,९५० देशी–विदेशी पर्यटकांनी गोव्‍याला भेट दिली. मार्च महिन्‍यात अमेरिका–इस्रायल आणि इराणमध्‍ये युद्धजन्‍य परिस्‍थिती निर्माण झालेली होती. त्‍याचा परिणाम हवाई वाहतुकीसह सिलिंडर आणि इंधन आयातीवर झाला.

Goa Tourism
Goa Viral Video: 'त्या' व्हिडिओप्रकरणी युवक जेरबंद, क्राईम ब्रँचची यूपीत कारवाई; व्हिडिओ व्हायरल केल्याचा ठपका

त्‍यामुळे यंदाच्‍या मार्चमध्‍ये ८,५६,०१५ पर्यटक गोव्‍यात दाखल झाले. यंदाच्‍या जानेवारी आणि फेब्रुवारीसह गतवर्षीच्‍या मार्चच्‍या तुलनेतही ही संख्‍या कमी झाली असून गतवर्षी मार्चमध्‍ये राज्‍यात देशी–विदेशी मिळून ८,८९,०९६ पर्यटकांनी भेट दिल्‍याचे आकडेवारीतून दिसून येते.

गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्‍ये राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या समाधानकारक राहिली, परंतु त्‍यानंतर जागतिक पातळीवर निर्माण झालेल्‍या युद्धजन्‍य परिस्‍थितीमुळे सिलिंडर, इंधनाच्‍या समस्‍या काही दिवस निर्माण झाल्‍या. त्‍यामुळे पर्यटकांची संख्‍या कमी झाली, पण आता ही परिस्‍थिती सुधारली आहे.

-गौरीश धोंड, हॉटेल व्‍यावसायिक

राज्‍यात येणाऱ्या देशी पर्यटकांची संख्‍या यंदा स्‍थिर राहिली, पण मध्‍यंतरीच्‍या काळात काही कंपन्‍यांच्‍या विमानसेवा ठप्‍प झाल्‍या. त्‍यात संबंधित कंपन्‍यांनी विमान प्रवासाचे दरही वाढवले. त्‍यामुळे विदेशी पर्यटकांची संख्‍या रोडावली. त्‍यात जागतिक पातळीवर निर्माण झालेल्‍या युद्धजन्‍य परिस्‍थितीमुळे निर्माण झालेल्‍या समस्‍यांचाही फटका बसला.

- जॅक सुखिजा, अध्‍यक्ष, ट्रॅव्‍हल अँड टुरिझम असोसिएशन

बैठका, कार्यक्रम, परिषदा, प्रदर्शनांना उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

जानेवारी ते मार्च या तीन महिन्‍यांच्‍या कालावधीत राज्‍यातील बैठका, प्रोत्साहन कार्यक्रम, परिषदा तसेच प्रदर्शने यांसारख्‍या परिसंस्‍थांचा विस्‍तार झाला. त्‍यामुळे या निमित्ताने गोव्‍याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्‍या कायम राहिल्‍याचा दावा पर्यटन खात्‍याने केला.

‘इंडिया एनर्जी वीक २०२६’मध्ये १२० हून अधिक देशांमधून ७५ हजारपेक्षा अधिक प्रतिनिधी, ७०० पेक्षा अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते. त्‍यामुळे गोव्याला मोठ्या व्यावसायिक कार्यक्रमांसाठी जागतिक यजमान म्हणून स्थान मिळाले.

वर्ल्ड लेजेंड्स प्रो–टी २० लीगने पर्यटकांच्या ओघात आणखी भर घातली. त्‍यातून राज्याच्या क्रीडा पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळाल्‍याचे पर्यटन खात्‍याने स्‍पष्‍ट केले आहे.

Goa Tourism
Goa Education: शैक्षणिक वर्षाचा 15 दिवसांतच 'फज्जा'! उकाडा, शिक्षकांच्‍या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ

गतवर्षीच्‍या तीन महिन्‍यांत आलेले पर्यटक

महिना देशी विदेशी एकूण

जानेवारी ९,८६,८४६ ६९,८४७ १०,५६,६९३

फेब्रुवारी ८,४४,२११ ६१,५५४ ९,०५,७६५

मार्च ८,३२,४५२ ५६,६४४ ८,८९,०९६

एकूण २६,६३,५०९ १,८८,०४५ २८,५१,५५४

यंदाच्‍या तीन महिन्‍यांत आलेले पर्यटक

महिना देशी विदेशी एकूण

जानेवारी १०,१३,६६४ ७२,७४८ १०,८६,४१२

फेब्रुवारी ८,४९,४४१ ५९,०९७ ९,०८,५३८

मार्च ८,२४,९३३ ३१,०८२ ८,५६,०१५

एकूण २६,८८,०३८ १,६२,९२७ २८,५०,९६५

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्‍हणतात...

२०२६ च्या पहिल्या तिमाहीत पर्यटन कामगिरी विक्रमी पातळीवर राहणे हे पर्यटनस्थळ म्हणून गोव्याच्या सामर्थ्याचे द्योतक आहे.

जागतिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळ्यांच्‍या वाढीमुळे पर्यटकांचा ओघ या तीन महिन्‍यांत कायम राहिला.

भारतातील शहरांशी गोव्याला जोडणाऱ्या थेट विमानमार्गांच्या विस्तारामुळे हे पर्यटन स्थळ पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. त्‍यामुळे देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com