Goa Shipyard Dredger Launch Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

Jan De Nul Shipbuilding Project: गोवा शिपयार्ड लिमिटेडने आंतरराष्ट्रीय जहाजबांधणी क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: गोवा शिपयार्ड लिमिटेडने आंतरराष्ट्रीय जहाजबांधणी क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. शिपयार्डमध्ये २७ नोव्हेंबर रोजी नेक्स्ट जनरेशन ट्रेलिंग सक्शन हॉपर ड्रेजर (टीएसएचडी) या अत्याधुनिक जहाजाचे यशस्वी लॉन्चिंग करण्यात आले. लक्झेंबर्गस्थित जान दे नुल कंपनीसाठी या जहाजाची बांधणी करण्यात येत आहे.

६ जून २०२४ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक जहाजबांधणी करारानुसार या जहाजाची निर्मिती सुरू आहे. गोवा शिपयार्डच्या व्यावसायिक जहाजबांधणी क्षेत्रातील विस्ताराच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या जहाजाची एकूण लांबी ८३ मीटर असून, हॉपरची क्षमता २ हजार घनमीटर आहे. त्यात अत्याधुनिक प्लग-इन हायब्रीड ऊर्जा प्रणाली बसविण्यात आली आहे.

लहान आणि गर्दीच्या बंदरांमध्ये तसेच मरिनांमध्ये काम करण्यासाठी या जहाजाची रचना करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे जहाजाला चार तासांपर्यंत स्वतंत्रपणे कार्यरत राहता येणार असून, इंधनाचा वापर आणि उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या लॉन्चिंगप्रसंगी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, संचालक (ऑपरेशन्स) नेल्सन डिसोझा, संचालक (वित्त) जहांगीर आलम अन्सारी, नागेश दास पै तसेच कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नेल्सन डिसोझा यांनी हा प्रकल्प संरक्षण जहाजबांधणीपलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी प्रगत व्यावसायिक जहाजे तयार करण्याची गोवा शिपयार्डची क्षमता अधोरेखित करणारा असल्याचे सांगितले. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या संकल्पनांशी सुसंगत असलेला हा प्रकल्प भारताच्या जहाजबांधणी क्षमतेवरील आंतरराष्ट्रीय विश्वासाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले. जीएसएलने जागतिक सागरी आणि व्यावसायिक जहाजबांधणी क्षेत्रात वाढत्या महत्त्वाकांक्षेसह एक अग्रगण्य संस्था म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Budh Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगती आणि धनलाभ! 2 डिसेंबरपासून 5 राशींचे चमकणार नशीब; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

SCROLL FOR NEXT