Goa Shipyard Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard: गोवा शिपयार्डला उज्ज्वल भविष्य; यंदाचा नफा 135 कोटी

गोवा शिपयार्डची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा शिपयार्डची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी गोवा शिपयार्डची कामगिरी सकारात्मक असून कंपनीचे 2021-2022 या आर्थिक वर्षामध्ये 135 कोटी नफा झाला असल्याची माहिती गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी दिली.

(Goa Shipyard Limited 56th Annual General Meeting was held)

गोवा शिपयार्डची सभा आभासी पद्धतीने पार पडली. याप्रसंगी उपाध्याय यांच्यासह इतर संचालक, लेखा परीक्षक व भागधारक उपस्थित होते. भागधारकांना प्रत्येकी पाच रुपये समभागावर 1.1 रुपये अंतिम लाभांश घोषित करण्यात आला. तसेच वर्षभरात 3.25 अंतरिम लाभांश घोषित करण्यात आले होते.

Goa Shipyard

तांत्रिकदृष्ट्या प्रगत फ्रिगेट्स बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर

भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात येणाऱ्या पाच खोल समुद्रातील गस्ती जहाज प्रकल्पातील शेवटची दोन जहाजे निर्धारित वितरण तारखांच्यापूर्वी वितरित करून गोवा शिपयार्डने पुन्हा आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. भारतीय नौदलासाठी दोन अत्यंत तांत्रिकदृष्ट्या प्रगत फ्रिगेट्स बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. भारतीय तटरक्षक दलासाठी दोन प्रदूषण नियंत्रण जहाजे व आठ द्रुतगती गस्ती जहाजे बांधण्याच्या कराराची अंमलबजावणी सुरू आहे. असे उपाध्याय यांनी सांगितले.

खोल समुद्रातील गस्ती जहाजे बांधणीसाठी लवकरच करार

उपाध्यय म्हणाले की, भारतीय नौदलासाठी पुढच्या पिढीची सात खोल समुद्रातील गस्ती जहाजे बांधण्यासाठी करारावर लवकरच स्वाक्षरी करणार आहे. या प्रकल्पाचे मूल्य 20 हजार कोटीपेक्षा अधिक असेल असे उपाध्याय म्हणाले. गोवा शिपयार्ड मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, कौशल्य भारत, तसेच विविध संरक्षणनिगडीत गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब व उपायोजना, रक्षा ज्ञान शक्ती इत्यादीसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

14 हजार 815 कोटी कामांची ऑर्डर

उपाध्याय यांनी कंपनीच्या सध्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. हातात असलेल्या अनेक प्रकल्पामुळे भविष्यात महसूल व नफा वाढून शिपयार्डला उज्ज्वल भविष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या गोवा शिपयार्डला 14 हजार 815 कोटींची कामांची ऑर्डर आहे. त्यापैकी 13 जहाजे व 19 नौका बांधण्याचे कामे विविध टप्प्यावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT