Goa tourism news  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav Carnival Schedule: वोस्सय!! 'शिगमोत्सव आणि कार्निव्हल'साठी गोव्याला जाताय? वेळ, तारीख, ठिकाणाची 'संपूर्ण माहिती' एका क्लिकवर

Shigmotsav- carnival Events 2025 Goa: गोव्यात होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांच्या वेळा आणि तारीखा जाणून घ्या

Akshata Chhatre

Goa Shigmotsav & Carnival 2025 Schedule: Dates, Timings & Locations

पणजी: गोव्यात येणाऱ्या काही दिवसांत शिगमोत्सव आणि कार्निव्हलची सुरुवात होणार आहे. गोव्याच्या परंपरेत शिगमोत्सवाला खूप जुने महत्व आहे. शिगमोत्सवाच्यावेळी ठिकठिकांणी घोडेमोडणी, चित्ररथ यांचे आयोजन केले जाते. गोवा पर्यटन विभागाने शुक्रवारी (दि. २४ जानेवारी) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत शिगमोत्सव, कार्निव्हल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे नियोजन केले. गोव्यात होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांच्या वेळा आणि तारीखा जाणून घ्या.

गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जिटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, पर्यटन संचालक केदार नाईक आणि जिटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर यांच्यासोबत नियोजन करणारी एक बैठक घेतली.

या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन सुव्यस्थित करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती तसेच यावेळी पर्यटन खात्याकडून शिगमोत्सव आणि कार्निव्हलच्या तारखांची माहिती जारी करण्यात आली.

गोव्यातील कार्निव्हलच्या तारखा: ( Goa Carnival Dates)

२८ फेब्रुवारीपासून पर्वरीतून कार्निव्हलला सुरुवात होणार आहे.

  • पणजी- १ मार्च

  • मडगाव- २ मार्च

  • वास्को- ३ मार्च

  • म्हापसा आणि मोरजी- ४ मार्च

पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा येथे होणाऱ्या कार्निव्हलसाठी पर्यटन खात्याकडून बक्षीस तसेच इतर आयोजनच्या खर्चासाठी २७,३५,००० रुपये रक्कम देण्यात आलीये तर पर्वरीत होणाऱ्या कार्निव्हलसाठी १७,३५,००० आणि मोरजीमध्ये होणाऱ्या कार्निव्हलसाठी १४,२५,००० रुपये देण्यात आले आहेत.

गोव्यात होणाऱ्या शिगमोत्सवाच्या तारखा: ( Goa Shigmotsav Date and Venue)

यंदाच्यावर्षी गोव्यात १५ मार्चपासून शिगमोत्सवाला सुरुवात होईल. शिगमोत्सव मिरवणूकीची सुरूवात फोंड्यातून होणार आहे. त्यानंतर,

  • मडगाव-१६ मार्च

  • मांद्रे आणि केपे -१७ मार्च

  • शिरोडा आणि कुडचडे- १८ मार्च

  • धारबांदोडा- १९ मार्च

  • कळंगुट-२० मार्च

  • वास्को- २१ मार्च

  • पणजी- २२ मार्च

  • म्हापसा आणि सांगे- २३ मार्च

  • काणकोण- २४ मार्च

  • पेडणे-२५ मार्च

  • कुंकळ्ळी आणि वाळपई- २६ मार्च

  • डिचोली- २७ मार्च

  • सांखळी-२८ मार्च

  • पर्वरी- २९ मार्च

अशाप्रकारे शिगमोत्सव पार पडेल.

शिगमोत्सव हा गोव्यातील संसकृतीचे प्रतिक आहे. गोव्यातील वाळपई, डिचोली सारख्या लहान शहरांमध्ये देखील पर्यटनाला चालना मिळावी आणि या क्षेत्रांचा विकास व्हावा म्हणून यंदाच्यावर्षी पर्यटनखात्याने या भागांना मिळणाऱ्या रकमेत ५०,००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवजयंतीसाठी ५ लाखांचा निधी

शुक्रवारी झालेल्या बैठकीत यंदा सरकारने शिवजयंतीसाठी पणजी, मडगाव, म्हापसा, मुरगाव, फोंडा आणि साखळी येथील समित्यांना प्रत्येकी ५ लाखांचा निधी दिला जाईल अशी माहिती पर्यटन संचालक केदार नाईक यांनी दिलीये. १९ फेब्रुवारी रोजी राज्यात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT