Goa Shigmotsav 2024  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2024 : पणजी शहरात सोमवारपासून शिमगोत्सवाची धूम

Goa Shigmotsav 2024 : विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ः यंदा प्रथमच १८ जूनऐवजी बांदोडकर मार्गावरून चित्ररथ मिरवणूक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav 2024 :

पणजी शिगमोत्सव समितीतर्फे २५ ते ३१ मार्चपर्यंत आझाद मैदानावर सुगम संगीत, नाटक, हिंदी वाद्यवृंद, लावणी अशा कार्यक्रमांसाह यंदाचा शिगमोत्सव साजरा होणार आहे.

पणजीत स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने यावर्षी प्रथमच १८ जून मार्गऐवजी बांदोडकर मार्गावरून चित्ररथ, रोमटामेळ,लोकनृत्य मिरवणूक निघणार आहे.

३० रोजी जुन्या सचिवालयाकडून संध्या. ५ वा. या मिरवणुकीला प्रारंभ होईल व रात्री १० पूर्वी ईएसजीकडे ती विसर्जित होईल. शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी कार्यक्रम जाहीर केला. मंगलदास नाईक व सचिव शांताराम नाईक उपस्थित होते.

विविधरंगी कार्यक्रम

२५ रोजी संध्याकाळी ७ वा. नवोदित युवा कलाकारांचा स्वर साज कार्यक्रम,२६ रोजी संध्या. ७ वा. ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा ६५ कलाकारांचा भव्य कार्यक्रम होणार आहे व त्यात शिवराज्याभिषेक हे खास असेल. २७ रोजी संध्याकाळी ७ वा. कला चेतना वळवई व राजदीप नाईक प्रस्तुत '' काणी नव्या युगाची'' हा नाट्यप्रयोग रंगणार आहे.

२८ रोजी संध्याकाळी ७ वा. ओंकार मेलोडीज ऑर्केस्ट्रा सादर होईल. २९ रोजी संध्या. ७ वा. ‘चांदणे स्वरांचे’ कार्यक्रम होणार आहे. ३१ रोजी ७ वा. 'तुमच्यासाठी कायपण' लावणी कार्यक्रम होईल.

सोमवारी गुलालोत्सव

सोमवार २५ रोजी आझाद मैदानावर सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० पर्यंत विविध जाती, धर्म,पंथ असलेल्या सर्वांना एकत्र आणणारा गुलालोत्सव,वाद्यवृंदाच्या तालावर खेळला जाणार आहे.सकाळी ९ वाजता श्री महालक्ष्मीला नमन करून मंदिराकडून रोमटामेळ वाजत गाजत आझाद मैदानाकडे निघेल.

बक्षिसांच्या रकमेत वाढ

यंदा चित्ररथ, रोमटामेळ स्पर्धकांसाठी बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. पर्यटन खात्याच्या सौजन्याने यंदा साडे दहा लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. चित्ररथासाठी अनुक्रमे रु.७५ हजार,रु. ६० हजार, रु.५० हजार, रु.४५ व रु.४० हजार अशी बक्षिसे असतील. शिवाय धेंपे उद्योग समूहातर्फे प्रथम तीन क्रमांकाना तसेंच रोमटामेळ विजेत्यांना अनुक्रमे १५,१० व १० हजारांची बक्षिसे देण्यात येतील. रोमटामेळ स्पर्धेसाठी अनुक्रमे रु.७५ हजार, रु.५० हजार, रु.४० हजार, रु.३० हजार व रु.२० हजार अशी बक्षिसे आहेत. शिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धेसाठी वेगळी बक्षिसे आहेत.

आचारसंहितेमुळे मिरवणूक वेळेतच!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्याने ३० मार्च रोजी चित्ररथ मिरवणूक वेळेत सुरू होऊन ती वेळेत संपविण्याचे बंधन असून स्पर्धकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंगलदास नाईक यांनी केले व संध्याकाळी ६ नंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत,असे कळवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT