Goa Beach Shacks Canva
गोवा

Goa Beach Shack: सहा शॅक्ससाठी कारवाई नको! ‘परवाने रद्द’ निर्णयाचा पुनर्विचार करा; संघटनेची मागणी

Goa shack permits: गोव्यातील शॅक व्यवसायावर आलेले संकट दूर करण्यासाठी शॅक मालक संघटनेने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची भेट घेतली.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील शॅक व्यवसायावर आलेले संकट दूर करण्यासाठी शॅक मालक संघटनेने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी पर्यटन विभागाने भाड्याने शॅक चालविण्यासाठी दिल्याने ते सिद्ध झाल्यावर शॅक परवाने रद्द करून ते शॅक हटविण्याचे आदेश जारी केले होते. या निर्णयावर पुनर्विचार करावा,अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, भाड्याने शॅक चालवायला दिल्याने परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मात्र, केवळ सहा शॅक बिगर गोमंतकीयांना देण्यात आले होते. इतर शॅक हे स्थानिक गोमंतकीयांनाच भाड्याने देण्यात आले होते.

गोमंतकीयांनी शॅक चालवले तर आम्हाला कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत.

‘परवाने रद्द’ची टांगती तलवार

गोव्यातील किनारपट्टीवरील शॅक हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असते. मात्र, पर्यटन विभागाने भाडेतत्त्वावर शॅक चालवण्यास दिले ते चालवणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. परिणामी अनेक शॅक धारकांवर परवाने रद्द होण्याची टांगती तलवार आहे. संघटनेने सरकारकडे स्थानिक शॅक व्यवसायिकांना वाचवण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असल्याने आता सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT