Goa September 2023 GST Collection: गोवा राज्य सरकारला सप्टेंबर महिन्यात जीएसटीतून 497 कोटी रूपये महसूल मिळाला आहे. केंद्राकडे सप्टेंबर 2023 मध्ये एकत्रित GST महसूल 1,62,712 कोटी रूपये जमा झाला आहे. यापैकी CGST ₹ 29,818 कोटी इतकी आहे तर SGST 37,657 कोटी रूपये इतके आहे तर IGST 83,623 कोटी रूपये आहे.
मागील वर्षी याच महिन्यातील GST महसुलापेक्षा सप्टेंबर 2023 चा महसूल 10 टक्के जास्त आहे. या महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 14 टक्के जास्त आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण GST संकलनाने 1.60 लाख कोटी रूपयांचा टप्पा ओलांडल्याची ही चौथी वेळ आहे.
देशात जीएसटी लागू झाल्यानंतर एप्रिल 2023 मध्ये या वर्षी सर्वाधिक जीएसटी संकलन झाले होते. हा आकडा 1.87 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2021-22 या आर्थिक वर्षात सरासरी मासिक जीएसटी संकलन 1.10 लाख कोटी रुपये होते.
तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सरासरी संकलन 1.51 लाख कोटी रुपये होते आणि 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत सरासरी संकलन रु. 1.69 लाख कोटी. जुन्या अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या जागी 1 जुलै 2017 रोजी देशभरात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.