history Book  Dainik Gomantak
गोवा

Hindu Janajagruti Samiti Goa: ‘सीबीएसई’ पाठ्यपुस्तकातून चुकीचा इतिहास वगळा!

म्हापसा येथे हिंदू राष्ट्र जागृतीची आंदोलनाद्वारे मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa : ‘सीबीएसई''च्या इयत्ता 7 वीच्या पाठ्यपुस्तकातील चुकीचा इतिहास व मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे त्वरित वगळावेत, अशी मागणी म्हापसा येथे हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या.

देशव्यापी हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलनाचा हा एक भाग आहे. आंदोलनाला सर्वश्री नितीन फळदेसाई, गोवा प्रमुख, राष्ट्रीय बगरंज दल; जयेश थळी, सचिव, गोमंतक मंदिर महासंघ; अधिवक्त्या रोशन सामंत, प्रमुख, विद्याभारती गोवा; राजश्री गडेकर, रणरागिणी आदींनी संबोधित केले.

या आंदोलनात ‘भारत माता की जय’, ‘विद्याभारती’, ‘राष्ट्रीय हिंदू वाहिनी’, ‘गोमंतक मंदिर महासंघ, रणरागिणी, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांनी सहभाग घेतला. विकृत आणि दिशाभूल करणारा इतिहास भावी पिढीला शिकवणे म्हणजे शिक्षणाचे विकृतीकरण आहे.

मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे असणारे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमातून त्वरित मागे घ्यावे, या विकृत आणि खोटा इतिहास लेखन करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि भारतीय पराक्रमी योद्ध्यांचा शौर्यशाली इतिहासाचा समावेश इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी ठराव मांडले. सूत्रसंचालन युवराज गावकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT