Mapusa News: सीबीएसईच्या पुस्तकातील इतिहास वगळा; वक्फ कायदा रद्द करा... हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनची मागणी

म्हापसा येथे हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन
Hindu organisations protest at Mapusa
Hindu organisations protest at Mapusa Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News: सीबीएसई च्या इयत्ता 7 वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळा आणि ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा, या मागण्यासाठी हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलनसह इतर हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने सोमवारी 17 जुलै रोजी म्हापसा येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बजरंग दलाचे गोव्याचे प्रमुख नितीन फळदेसाई, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव गोमंतक मंदिर महासंघ, विद्याभारतीच्या प्रमुख रोशन सामंत, राजश्री गडेकर आदींची भाषणे झाली.

Hindu organisations protest at Mapusa
G20 Defamation Notice: मारियो मिरांडाज गॅलरीला G20 आयोजकांकडून 25 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस

शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांतून विकृत इतिहास शिकवला जात आहे. सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकामध्ये मुघल, इंग्रज, तसेच पोर्तुगीज यांना ‘राष्ट्रीय नायकां’च्या रूपात बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे, हे निषेधार्ह आहे.

विकृत आणि दिशाभूल करणारा इतिहास भावी पिढीला शिकवणे म्हणजे शिक्षणाचे विकृतीकरण आहे. मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे असणारे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमातून त्वरित मागे घ्यावे, या विकृत आणि खोटा इतिहास लेखन करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि भारतीय पराक्रमी योद्ध्यांच्या शौर्यशाली इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात करावा.

तसेच सामान्य जनतेची भूमी हडपून ‘लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करावा.

Hindu organisations protest at Mapusa
Goa Forest Officer Missing: उसगाव रेंज फॉरेस्ट अधिकारी बेपत्ता; मिरामार परिसरात आढळली कार

देशात ‘समान नागरी कायदा’ लागू करून अल्पसंख्यांकांच्या नावावर लागू करण्यात आलेल्या सर्व विशेष सुविधा, कायदे, आयोग, मंडळे, शासकीय विभाग संपुष्टात आणून सर्वांना समान वागणूक द्यावी.

भारत माता की जय, विद्याभारती, राष्ट्रीय हिंदू वाहिनी, गोमंतक मंदिर महासंघ, रणरागिणी, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी ठराव मांडले. सूत्रसंचालन युवराज गावकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com