Goa School परवानगीविना शाळा सुरू कराल तर होणार कारवाई! Dainik Gomantak
गोवा

परवानगीविना शाळा सुरू कराल तर होणार कारवाई!

सरकारचे परिपत्रक : पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास अटकाव

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील सर्व शाळांना (School) फक्त 7 वी व 8 वीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासंदर्भातील परिपत्रक काढले असले तरी काही शाळा व्यवस्थापनांनी 6 वीसह इतर इयत्तांचेही वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी आज नव्याने परिपत्रक काढून परवानगीशिवाय इतर इयत्तांचे वर्ग (Goa School) सुरू करणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे.

सरकारने (Government) यापूर्वीच 9 वी ते 12 वीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर 25 नोव्हेंबरपासून 7 वी व 8 वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे शाळा व्यवस्थापनांनी 7 वी ते 12 वीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू केले आहेत. मात्र, काही शाळांनी इतर वर्गही सुरू केल्याने त्याची दखल शिक्षण खात्याने घेतली आहे.

कोरोना (Corona) विषयक कृती दल समितीच्या बैठकीत राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची शिफारस केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावरील निर्णय प्रलंबित ठेवला आहे. पालक-शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन, राजकीय पक्ष तसेच विविध क्षेत्रांतील घटकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे त्यांनी सूचित केले होते. राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी सावधगिरी म्हणून 25 नोव्हेंबरपासून 7 वी व 8 वीच्या वर्गांना परवानगी देताना हायब्रीड पद्धतीची मुभा ठेवली होती.

7 ते 12 पर्यंचे वर्ग सुरू करण्यास शिक्षण खात्याने परवानगी दिली, पण काही ठिकाणी पहिलीपासूनच वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू आहे. काही शाळांत खोल्याची संख्या कमी आहे. पुरेशी वाहतूक व्यवस्थाही नाही. अशा परिस्थितीत छोट्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलविणे चुकीचे आहे.

मुलांच्या लसीकरणाचे काय?: शाळा-महाविद्यालयांमधील काही वर्ग सुरू झाले असले तरी शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शासकीय पातळीवरून अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. जरी शाळा व्यवस्थापन काळजी घेत असले तरी लसीकरण झाले नसल्याने पालकांना पाल्यांची चिंता भेडसावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT