गोव्यात वाहतूक कोंडीची समस्या आणखी तीन आठवडे कायम

‘अटल सेतू’ची दुरुस्ती लांबणीवर
Repair of Atal Setu postponed in goa
Repair of Atal Setu postponed in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अटल सेतूचा पर्वरी आणि मेरशीला जोडणारा उत्तरेकडील रस्ता आणखीन तीन आठवड्यांसाठी वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात येईल, असा आदेश उत्तर गोव्याच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. यामुळे गेले तीन महिने वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सोसावा लागणाऱ्या प्रवासीवर्गाच्या हालअपेष्टांत डिसेंबरमधील वाढीव वाहतुकीची भर पडणार असून सरकारच्या या नियोजनशून्य कारभाराचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

यापूर्वी तीन महिन्यांसाठी वाहतूक बंद केली असता अपेक्षित दुरुस्ती आणि डांबरीकरण झाले नसल्याचे कारण सांगून पुलाचे कंत्राटदार लार्सन ॲण्ड टुब्रो कंपनीने वाढीव कालावधी मगितल्याने दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिल्याचे पुलाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या साधनसुविधा विकास मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. कामातील विलंबासाठी अवेळी पडलेल्या पावसाचे कारण देण्यात आले आहे. 21 नोव्हेंबरपासून 15 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पुलाचा हा भाग वाहतुकीसाठी निषिद्ध राहील. याआधी 20 ऑगस्टपासून दुरुस्तीसाठी तो 100 दिवस बंद ठेवण्यात आला होता.

Repair of Atal Setu postponed in goa
‘अटल सेतू’ बांधकाम दर्जावर प्रश्‍नचिन्ह 

सदोष बांधकामाचा आरोप मंत्र्यांनी नाकारला

पुलाच्या चटई क्षेत्राशी संबंधित काही समस्या उद्भवल्या आहेत. पुलाला दिवजा वाहतूक बेटाशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले असून त्यासाठी वाहतुकीवर अल्पकाळासाठी बंदी लागल्याचे सांगत साबांखा मंत्री दीपक पाऊसकर यांनी पुलाचे काम सदोष असल्याचा आरोप नाकारला. पुलाचे वयोमान १०० वर्षे निश्चित केले असल्याकडे निर्देश करत ही समस्या तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे सांगितले.

Repair of Atal Setu postponed in goa
अटल सेतू वरील विद्युत यंत्रणेबाबत ३० कोटींचा घोटाळा: संजय बर्डे

डिसेंबर महिन्यात गोव्यातला पर्यटन हंगाम उचल खातो आणि विमानतळावरून उत्तर गोव्यात होणारी वाहतूक लक्षणीयरित्या वाढते. हे ओळखून पुलाच्या कामाचे नियोजन व्हायला हवे. मात्र, सरकारी खाती तहान लागल्यानंतर विहीर खणण्याचे काम करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. सायंकाळच्या वर्दळीवेळी मेरशीच्या बाजूने वाहतुकीची कोंडी होऊन वाहने तासन् तास खोळंबण्याचे प्रकार सध्या येथे वरचेवर घडत असून अनेकदा वाहतूक पोलिसांचाही तेथे निरुपाय होताना दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com