Goa Scholarship for Disabled Students: गोव्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने पुरस्कृत केलेल्या तीन शिष्यवृत्तींसाठी समाज कल्याण संचलनालयाने अर्ज मागवले आहेत. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर हे अर्ज भरता येऊ शकतात.
प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक आणि पदवी शिक्षण यासाठीच्या या स्कॉलशिप्स आहेत. या शिष्यवृत्तींबाबत सविस्तर जाणून घेऊया.
प्री मॅट्रिक स्कॉलरशिप नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थी रेग्युलर आणि पूर्णवेळ असला पाहिजे. केंद्रीय किंवा राज्याच्या बोर्डाचा अभ्यासक्रम असलेल्या सरकारी शाळेचा तो विद्यार्थी असावा, अशी या स्कॉरशिपसाठीची पात्रता आहे.
पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर अकरावी ते पदव्युत्तर पदवी या दुसऱ्या शिष्यवृत्तीत दहावीनंतर किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सेकंडरी कोर्सेस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
तर स्कॉलरशिप फॉर टॉप क्लास एज्युकेशन फॉर ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑर डिप्लोमा या शिष्यवृत्ती केवळ पदवी किंवा पदव्युत्तरचे विद्यार्थी अर्ज करू शकतील. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थांमध्ये ते शिकत असावेत, अशी पात्रता आहे.
स्कॉलरशिप्ससाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टवलर नोंदणी एक ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या सर्व शिष्यवृत्तींबाबतची सविस्तर माहिती या पोर्टलवर आहे. केवळ ऑनलाईनच अर्ज करता येणार आहे.
प्री मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी 30 नोव्हेंबरपूर्वी पोर्लटवर लॉगिन करावे लागेल. तर उर्वरित दोन स्कॉलरशिप्ससाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत लॉगिन करावे लागेल.
याबाबत काही शंका असल्यास नोडल ऑफिसर म्हणून उपसंचालक रश्मी रावल मडगाव यांच्याशी तर दक्षिण गोव्यासाठी डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर म्हणून सुप्रिया मांजरेकर आणि उत्तर गोवा डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर म्हणून अॅनेस सिक्वेरा गोम्स यांच्याशी संपर्क करावा, असे याबाबतच्या परिपत्रकात म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.