Youngest Scuba Divers: बंगळूरूमधील 10 वर्षांची ओवी ठरली सर्वांत तरूण स्कुबा डायव्हर; गोव्याच्या प्रशिक्षकाने...

14 वर्षांची बहिण आणि वडिलही आहेत स्कुबा डायव्हर
Youngest Scuba Divers
Youngest Scuba DiversDainik Gomantak
Published on
Updated on

Indias Youngest Scuba Divers: बंगळूरूतील 10 वर्षांची ओवी मालवे सर्वात तरूण स्कुबा डायव्हर ठरली आहे. तसे प्रमाणपत्र तिला बहाल करण्यात येत आहे. हा जागतिक विक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बंगळूरू माउंटेनिअरिंग क्लबचे संस्थापक नीरज मालवे यांची ओवी ही कन्या आहे. ओवी आणि तिची 14 वर्षांची बहिण रूची ही देखील स्कुबा डायव्हर आहे. या दोघीही सर्वात तरूण स्कुबा डायव्हर भगिनी ठरल्या आहेत.

त्यांचे वडिल नीरज स्वतः 16 व्या वर्षांपासून स्कुबा डायव्हर आहेत. ओवीने 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजून 18 वाजता पुद्दुचेरी येथे हा पराक्रम केला.

Youngest Scuba Divers
नौदलातील माजी जवान कुटूंबासह गोव्याच्या ट्रिपवर; तिकडे घरातील मौल्यवान वस्तूंवर चोरांचा डल्ला...

नीरज म्हणाले की, साहसी खेळ सोपे नसतात. मी मुलींवर कोणताही दबाव टाकला नाही. पण त्यांना आवड होती. मग त्यांना योग्य प्रशिक्षण दिले. दोन्ही मुलींना लहान पणापासून स्कुबा डायव्हिंगच्या व्हिडिओंची त्यांना भूरळ पडली होती.

त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली.

ओवी हीला पुदुचेरी येथील टेम्पल अॅडव्हेंचर्स येथील ज्युनियर ओपन वॉटर डायव्हर कोर्ससाठी नावनोंदणी करण्यात आली. तिला प्रशिक्षक श्रेया मेहता यांनी प्रशिक्षण दिले. तर ओवीची बहीण रुची (14) हिला गोव्यातील शौर्य तरणी यांनी प्रशिक्षण दिले.

रुचीने 27 ऑक्टोबर 2022 रोजी ज्युनियर ओपन वॉटर डायव्हर सर्टिफिकेट कोर्ससाठी नावनोंदणी केली आणि 30 ऑक्टोबर 2022 रोजी स्कूबा स्कूल्स इंटरनॅशनल सर्टिफिकेट प्राप्त केले.

वयाच्या 10 आणि 13 व्या वर्षी दोन्ही मालवे बहिणी जगातील सर्वात तरुण स्कूबा डायव्हर भगिनी बनल्या.

Youngest Scuba Divers
बॉयफ्रेंडचा खून करून गोव्यात सेलिब्रेशन करणार होती गर्लफ्रेंड; नवीन मित्राला करायला लावला गोळीबार

ओवी आणि रूची या दोघी बहिणींनी दोन दिवसांचे कठोर प्रशिक्षण घेतले ज्यामध्ये 200 मीटर नॉनस्टॉप पोहणे आणि 10 मिनिटे कोणत्याही आधाराशिवाय तरंगणे याचा समावेश नाही.

पाण्याखाली कौशल्ये शिकली. त्यांनी लेखी परीक्षाही उत्तीर्ण केली आणि 18 मीटर खोलीपर्यंत त्यांनी ओपन वॉटर डायव्हिंग केले. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. आता त्यांना जगात कुठेही स्कूबा डायव्हिंग करण्याची परवानगी आहे.

रुचीला सागरी संवर्धनावर काम करण्याची इच्छा आहे. तर ओवीला तिच्या वडिलांच्या उपक्रमात शिक्षक बनून जगभर जाण्याची इच्छा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com