Bogus voter list Goa Dainik Gomantak
गोवा

Bogus Voter List: सांताक्रुझमध्ये 3000, सुरावलीमध्ये 100 बोगस मतदार; काँग्रेसकडून पुरावे सादर; छोट्या घरात 26 नावे असल्याचा दावा

Bogus Voters Goa: सांताक्रुझ मतदारसंघात सुमारे तीन हजार बोगस मतदार असल्याचा दावा करत पुरावे सादर केले; तर सुरावली पंचायत क्षेत्रात १०० बोगस मतदार असल्‍याचा आरोप ॲड. राधाराव ग्रासियस यांनी केला.

Sameer Panditrao

पणजी: मतदारयादीत बोगस नावे घुसवल्याच्या आरोपांवरून सध्या देशभर रान उठले आहे. गोव्‍यातही त्‍याचे पडसाद उमठत आहेत. सांताक्रुझ काँग्रेस गटाध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे या मतदारसंघात सुमारे तीन हजार बोगस मतदार असल्याचा दावा करत पुरावे सादर केले; तर सुरावली पंचायत क्षेत्रात १०० बोगस मतदार असल्‍याचा आरोप ॲड. राधाराव ग्रासियस यांनी केला.

जॉन नाझारेथ आणि एडविन वाझ यांनी आज सकाळी आल्तिनो-पणजी येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन बामणभाट-मेरशी येथील एकूण २६ बोगस मतदारांची नावे हटविण्याचा विनंतीअर्ज सादर केला. या अर्जासोबत एकाच घरक्रमांकावर वेगवेगळी नावे असल्याचे पुरावे त्यांनी जोडले आहेत.

याप्रसंगी उपस्थित काँग्रेस समितीचे सहसचिव एडविन बेनी वाझ यांनी सांगितले की, २५ जानेवारी २०२५ रोजी संयुक्त मामलेदारांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारे बोगस मतदार आढळतील, असेही त्यांनी नमूद केले.

छोट्याशा घरात २८ मतदार?

सांताक्रुझ मतदारसंघातील बामणभाट-मेरशी येथे बोगस मतदारांचा प्रकार उघडकीस आला आहे. ३२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका लहान घरात २६ बोगस मतदार दाखविण्‍यात आले आहेत. यापैकी १५ जणांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानही केले होते. प्रत्‍यक्षात दोनच मतदार त्‍या घरात राहतात तर उर्वरित मतदार निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी येतात. त्यांची नावे आणि इपिक कार्ड क्रमांक दर्शविणारे पुरावे अर्जासोबत जोडले आहेत, असे नाझारेथ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बीएलओंवर फौजदारी गुन्‍हा नोंदवा : ग्रासियस

सुरावली पंचायत क्षेत्रात १०० बोगस मतदार असून, उपसरपंच कामिल दोरादो यांच्या बारच्‍या पत्त्‍यावर त्यांची नावनोंदणी असल्‍याचे आढळून आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ॲड. राधाराव ग्रासियस यांनी केली. आज सोमवारी त्यांनी आपल्या कार्यालयात तक्रारदार ज्‍योकिम डायस यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली.

आम्ही या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच सासष्टी संयुक्त मामलेदारांकडे तक्रार नोंदविली आहे. या भागातील बीएलओ व अन्य संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांवर फैजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रासियस यांनी केली. तर, दोरादो यांच्या मालकीचे दोन बार आहेत. एका ठिकाणी ८० तर दुसऱ्या ठिकाणी २० जणांची नावे मतदारयादीत आहेत. हे मतदार परप्रांतीय आहेत. त्यांच्याकडे या पत्त्‍यावरील आधारकार्डही नाही. ते कामगार येथे राहत नाहीत, मात्र निवडणुकीवेळी येऊन मतदान करतात, असा आरोप डायस यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Revoda Fire: AC मध्ये झाले शॉर्टसर्किट, फ्लॅटला लागली आग; 6 लाखांचे नुकसान, 2 युवती जखमी Video

Goa Today Live Updates: भाजपला मोठा धक्का! बाबू आजगावकर यांचा तोरसे झेडपी निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Bhoma: 'भोममधील मंदिरांची हानी होणार नाही'! मंत्री नितीन गडकरींचे स्पष्टीकरण; लोकसभेत कॅ. विरियातोंनी विचारला प्रश्‍‍न

लग्नाचे आश्वासन देऊन महिलेशी केली मैत्री, लैंगिक अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; वडिल, मुलाचा फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

Harbhajan Singh: "मोहम्मद शमी कुठेय?" टीम इंडियाच्या सिलेक्शनवर हरभजन सिंह संतापला; गंभीर-आगरकर यांच्यावर उठवली टीकेची झोड!

SCROLL FOR NEXT