Goa road accident deaths Dainik Gomantak
गोवा

अपघाती मृत्यूंची संख्या वाढली, तरी गुन्हे नोंद कमीच; पोलिसांची आगळी तऱ्हा, मृत्यूत 7 टक्क्यांची वाढ; कारवाईत 35 टक्क्यांनी कपात

Goa road accident deaths: गोव्यात होणारे रस्ते अपघात आणि त्यात पडणारे बळी यांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे गोवा पोलिसांकडून वारंवार सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वेगळीच स्थिती असल्याचे दिसून येते.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: गोव्यात होणारे रस्ते अपघात आणि त्यात पडणारे बळी यांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे गोवा पोलिसांकडून वारंवार सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वेगळीच स्थिती असल्याचे दिसून येते. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत गोवा पोलिसांच्या पोर्टलवरून जी माहिती उपलब्ध झाली, त्यानुसार यंदा पहिल्या तीन महिन्यांत गोव्यातील अपघाती मृत्यूंची टक्केवारी ६.७८ टक्क्यांनी वाढली असली तरी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर जी कारवाई झाली, ती मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३५.६५ टक्क्यांनी कमी झाली आहे.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तब्बल ५९८ रस्ते अपघात घडले असून २०२५ सालच्या पहिल्या तीन महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण ७.०५ टक्क्यांनी वाढले आहे. यंदा पहिल्या तीन महिन्यांत एकूण ६० जीवघेणे अपघात झाले असून त्यात ६३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६.७८ टक्क्यांनी अधिक आहे. त्यानंतरच्या २५ दिवसांत (२५ एप्रिलपर्यंत) हे प्रमाण ७५ जीवघेण्या अपघातांत ७८ बळी इतपत वाढले आहे.

या तुलनेत वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे आणि त्यांच्याकडून वसूल केलेला दंड यात फार मोठी तफावत दिसते.

यासंबंधी वाहतूक पोलिस विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, आता गोवा पोलिसांना बॉडी कॅमेरे दिले आहेत.

त्यामुळे गुन्ह्यांची नोंदणी वाढण्याची गरज होती. पण स्थानिक पोलिस स्थानकांकडून योग्य त्या प्रमाणात कारवाई होत नसल्यामुळेच ही आकडेवारी एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

१ जानेवारी ते २५ एप्रिलपर्यंतची आकडेवारी

  जीवघेणे अपघात- ७५

  दुचाकीचालक मृत्‍यू - ३३

  दुचाकीवरील सहप्रवाशांचे मृत्‍यू - ०८

  वाहनचालकांचे मृत्‍यू - ०६

  पादचाऱ्यांचे मृत्‍यू - ०५

  प्रवाशांचे मृत्‍यू - ०४

  सायकलस्‍वारांचा मृत्‍यू- ०१

  इतर प्रकारचे मृत्यू - ०१

गतवर्षीपेक्षा गुन्हे घटले; दंडही कमी

२०२५ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत अशा प्रकारचे तब्बल ९९,४४२ गुन्हे नोंद केले होते. यंदा पहिल्या तीन महिन्यांत फक्त ६३,९८२ गुन्हे नोंद झाले आहेत, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत ३५,४६० नी कमी झाले आहे. म्हणजेच हे प्रमाण ३५.६५ टक्क्यांनी कमी झाले आहे.

२०२५ साली पहिल्या तीन महिन्यांत एकूण ६.३९ कोटी रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला होता. मात्र, यंदा पहिल्या तीन महिन्यांत फक्त १.८१ कोटींचा दंड वसूल केला आहे. हे प्रमाण ४.५८ कोटी रुपयांनी कमी आहे. हे प्रमाण ७१.५९ टक्क्यांनी कमी झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यात उन्हाचा 'हिट'मॅन! सलग 3 दिवस पारा 35 अंशांवर, नागरिक उकाड्याने हैराण

Drowning Death: सुटीत मावशीकडे आलेल्या ऋग्वेदवर काळाचा घाला, 6 वर्षांच्या मावसभावासह दोघांचा बुडून मृत्यू

Gautam Khattar: गौतम खट्टरला आज गोव्यात आणणार, पोलिस चौकशीत सत्य उघड होण्याची शक्यता; आयोजकांचीही होणार चौकशी

Horoscope: आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी ठरणार वरदान; सूर्यदेव होणार प्रसन्न, बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

'मोसाद'शी संबंधित हेराला इराणमध्ये फाशी, हिंसाचाराचा ठेवला ठपका; जागतिक स्तरावर संतापाची लाट, पण तेहरान ठाम!

SCROLL FOR NEXT