Goa Farmers Compensation Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भातशेतीसाठी 40 हजार नुकसान भरपाई; मिरची उत्पादकांनाही मिळणार मदत

Goa Rice Farming Compensation: राज्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेती तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मिरचीवर कीड पडून उत्पादनात घट झाली.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेती तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा मिरचीवर कीड पडून उत्पादनात घट झाली. या शेतकऱ्यांनी कृषी संचालनालयाने मदत करावी यासाठी मागणी केली होती.

त्यानुसार राज्यातील भातशेती आणि मिरची उत्पादक शेतकऱ्यांना शेतकरी आधार निधीअंतर्गत मदत करण्यात येणार असल्याचे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे राज्यातील ९८ हेक्टर क्षेत्रफळातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे आम्ही केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

राज्यातील सुमारे ३२३ भातशेती केलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून भातशेती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला प्रतिहेक्टर ४० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे ठरविण्यात आले असून त्याची रक्कम येत्या काही दिवसांत त्यांना मिळणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

डिचोली भागात यंदा मिरचीवर कीड पडून काढायला आलेली मिरची पांढरी पडू लागली होती. उत्पादनही ५० टक्क्यांहून अधिक घटले होते. या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबत कळविले होते व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती.

त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले आहेत त्यांना ही भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT