Goa Monsoon
Goa RainDainik Gomantak

Goa Monsoon: गोव्यात 5 दिवस ‘ऑरेंज अलर्ट’! वाऱ्यांचा वेग वाढण्‍याची शक्‍यता; खबरदारी घेण्‍याचे आवाहन

Goa Weather: पुढील पाच दिवस ताशी ४० ते ५० किमी वाऱ्याच्या वेगासह राज्यात पावसाची रिपरिप सुरू राहणार असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
Published on

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी काहीसा जोर धरला. मात्र, रेड अलर्ट जारी केला असला तरी तशी पावसाची तीव्रता नव्हती. गुरुवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मात्र, पुढील पाच दिवस ताशी ४० ते ५० किमी वाऱ्याच्या वेगासह राज्यात पावसाची रिपरिप सुरू राहणार असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे.

Goa Monsoon
Goa Weather Update: गोव्यात 7 दिवस यलो अलर्ट! वादळी वाऱ्यासह 'कोसळधार' बरसणार

गेल्या २४ तासांत राज्यात ४०.६ मिमी म्हणजेच १.५९ इंच पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत १४०.३ मिमी म्हणजे ५.५२ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Goa Monsoon
Goa Rain: गोव्यात एकीकडे धो-धो पाऊस, दुसरीकडे रस्ता हॉटमिक्सिंगचे काम; पावसाळी कामांच्या नियोजनाचा फेरविचार हवा

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

ज्यावेळी एका तासात १५ ते ३० मिमी पाऊस पडतो आणि पुढील काही तासांत असाच पाऊस पडण्याची शक्यता असते, त्यावेळी ऑरेंज अलर्ट जारी केला जातो.

या अलर्टला पूर्वकल्पना देणारा अलर्ट, असेही म्हटले जाते. कोणत्याही ठिकाणी आपत्ती आल्यास सज्ज रहा, असा संकेत देणारा हा अलर्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com