Ribandar  Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: रायबंदर-पाटो पुल खचतोय; वारसा पूल असल्याने दुरुस्तीसाठी घेणार विशेष तंत्रज्ञानाची मदत

आश्वासन : चारशे वर्षे जुना रस्ता खचतोय; साळकरांनी मांडला विषय

गोमन्तक डिजिटल टीम

Nilesh Cabral रायबंदर-पाटो हा चारशे वर्षे जुना पूल खचत चालला आहे. तो वारसा पूल असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे. सरकार त्यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याशी आवश्यक तो पत्रव्यवहार करेल.

गरज भासली तर मुख्यमंत्री पातळीवर हस्तक्षेप केला जाईल; पण त्या पुलाची आणि खचत चाललेल्या रस्त्याची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी विधानसभेत दिले.

आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता. साळकर म्हणाले, चारशे वर्षे जुना असा रायबंदर-पाटो रस्ता खचू लागला आहे, ही चिंतेची बाब आहे. पूर्वीच्या काळी घोडागाडीसाठी बनवण्यात आलेल्या रस्त्यावरून आता सर्व प्रकारची वाहतूक होते.

मध्यंतरी तो खचला त्यामुळे नोव्हेंबर २०२१ मध्ये तो वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. त्यानंतर दुरुस्ती झाली. तरीही तो रस्ता व पूल खचू लागल्याचे दिसते. सरकारने प्राधान्याने हा विषय हाती घेत हा पुरातन वारसा जपावा.

काब्राल यांनी 1634 मध्ये बांधकाम केलेला पाटो आता दुरुस्तीला आल्याचे मान्य केले. ते म्हणाले, घोडागाडीसाठी बनवलेल्या या साडेतीन किलोमीटरच्या मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक होत होती.

1980 मध्ये या रस्त्याची धूप थांबवण्यासाठी पश्चिम दिशेला खारफुटीची लागवड करण्यात आली आहे. भरतीच्या पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट रचना असलेल्या या पूल आणि रस्त्याला आता भरतीच्या पाण्यापासूनच धोका निर्माण झाला आहे.

काही ठिकाणी गाळ साचल्याने पाण्याचा निचरा बंद झाल्याचा फटकाही बसला आहे. या रस्त्याची परिस्थिती पाहून वेगनियंत्रणासह केवळ हलक्या वाहनांसाठी तो खुला ठेवण्यात आला आहे. प्रवासी बसही या रस्त्यावरून जातात.

‘पुरातत्व’ची मदत आवश्‍यक

हा पूल व रस्ता दुरुस्त केला पाहिजे याविषयी दुमत नाही. मात्र, हा पूल व रस्ता पुरातन वारसा असल्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याची आवश्यक ती परवानगी व त्यांची तांत्रिक मदत लागणार आहे.

त्यांच्याशी पत्रव्यवहार केला जाईल. त्यातही विलंब झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हस्तक्षेप करून दुरुस्ती मार्गी लावली जाईल, असे काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT