Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात तिसऱ्यांदा शून्य कोरोना रूग्णांची नोंद, सक्रिय रूग्ण संख्येत मोठी घट

गुरूवारी 381 कोरोना नमूने तपासण्यात आल्या आहेत.

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्यात कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा शून्य कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. गुरूवारी (दि.15) एकही नवीन रूग्णांची नोंद झाली नसून, दोन कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरूवारी 381 कोरोना नमूने तपासण्यात आल्या आहेत.

(Goa reported 0 corona cases and two discharge on Thursday)

गोवा आरोग्य विभागाने (Goa Health Department) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात सध्याच्या घडीला 14 कोरोनाबाधित रूग्णांवर (Active Corona Cases In Goa) उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 2 लाख 59 हजार 053 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 55 हजार 026 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर 4,013 जणांचा  कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.45 टक्के एवढा झाला आहे.

भारतात 200 नवे रूग्ण, पाच मृत्यू

भारतात गेल्या 24 तासांत 200 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आजवर 4.46 कोटी लोक बाधित झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला 3,767 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases In India) उपचार सुरू आहेत. देशात आजवर पाच लाख 30 हजार 663 जणांचा बळी गेला आहे. भारताचा कोरोना रिकव्हरी रेट 98.80 टक्के एवढा आहे. (India Corona Update)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT