Pramod Sawant: असुविधा के लिए खेद है! गोव्याचे CM तीन दिवस 'ऑफलाईन'

मुख्यमंत्री कोणत्या कारणास्तव बाहेर जाणार आहेत. याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

Goa: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) तीन दिवस राज्याबाहेर असणार आहेत. त्यामुळे राज्यातील त्यांचे सर्व कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. आजपासून 18 डिसेंबर दरम्यान मुख्यमंत्री सावंत राज्याबाहेर असतील अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO Goa) वतीने देण्यात आली आहे.

CM Pramod Sawant
Yuri Alemao: अधिवेशनाच्या कमी कालावधीवरून विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केला संताप; राज्य सरकार घाबरल्याची टीका

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 16 ते 18 डिसेंबर राज्याबाहेर असणार आहेत. यामुळे या कालावधीत होणाऱ्या कोणत्याही बैठकीला ते उपस्थित राहू शकणार नाहीत. आपली गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी या काळात मुख्यमंत्र्यांच्या पणजी, पर्वरी आणि साखळी येथील कार्यलयाला भेट देऊ नये. असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कोणत्या कारणास्तव बाहेर जाणार आहेत. याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.

CM Pramod Sawant
Goa Assembly: रेशन घोटाळा, PSI भरती, बेरोजगारीचा मुद्दा गाजणार; जानेवारीत विधानसभेचे हिवाळी अधिवेशन

दरम्यान, गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत होणार होणार आहे. केवळ चार दिवस होणाऱ्या या अधिवेशनाची सुरूवात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने होणार आहे. हिवाळी अधिवेशानात रेशन घोटाळा, कला अकादमी नूतनीकरण, खाण लिलाव, वाढती बेरोजगारी आणि PSI घोटाळा हे मुद्दे गाजणार असे दिसत आहे.

'भाजप सरकारचा लोकशाहीविरोधी अजेंडा पुन्हा एकदा उघड झाला आहे. भाजप सरकारला विरोधकांचे भय वाटत असल्याचेच हे लक्षण आहे.' अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अधिवेशनाच्या कमी कालावधीवरून केली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com