North Goa Rent a Car Association Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Rent-a-Car: 'निर्णय मागे घ्या' नाहीतर...! रेन्ट अ कार व्यावसायिकांची पणजीत धडक; वाहतूक खात्याच्या परवाना निर्णयाविरुद्ध संताप

North Goa Rent a Car Association Protest: १२ वर्षे पूर्ण केलेल्या रेन्ट अ कारचा परवाना नूतनीकरण केला जाणार नाही हा निर्णय वाहतूक खात्याने मागे घ्यावा, अशी मागणी रेन्ट अ कार व्यावसायिकांनी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: १२ वर्षे पूर्ण केलेल्या रेन्ट अ कारचा परवाना नूतनीकरण केला जाणार नाही हा निर्णय वाहतूक खात्याने मागे घ्यावा, अशी मागणी रेन्ट अ कार व्यावसायिकांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी आज वाहतूक संचालक कार्यालयात धडक दिली.

या व्यावसायिकांनी सांगितले, की एखादी गाडी बदलून परवाना धारकाने नवीन वाहन घेतले तरी परवान्याची मुदत मात्र १२ वर्षेच ठेवली जाते हे अन्यायकारक आहे. सरकारने एकतर्फीपणे हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांचा उदरनिर्वाह धोक्यात येणार असा दावा उत्तर गोवा (North Goa) रेन्ट अ कार संघटनेने केला आहे. न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी आजच्या भेटीवेळी दिल्याचे सांगितले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असताना रेन्ट अ कार व्यवसायाच्‍या मुळावर ते उठले आहे. रेन्ट अ कार ही संकल्पना परवान्यासाठी सरकारनेच आणली आणि सरकारच आता व्यवसाय संपवू पाहात आहे. १२ वर्षानंतर वाहन खासगी केले तरी काहीजण व्यवसाय सुरू ठेवतील त्यातून बेकायदेशीरपणाच वाढेल हे सरकार लक्षात घेत नाही.

प्रमुख मागण्या...

रेन्ट अ कार परवान्याला मुदतीची अट नको

परवानाधारकाला वाहन बदलण्याची मुभा

१२ वर्षानंतर वाहन बाजूला काढू नका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT