
पणजी: राज्यात खासगी वाहने रेंट-अ-कॅब म्हणून देण्याची प्रकरणे उघड झाली आहेत आणि या प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी आणि असा अनधिकृत व्यवहार थांबवण्यासाठी आता राज्य सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे अनधिकृतपणे रेंट-अ-कॅबचा व्यवसाय करणाऱ्यावर आता पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. खासगी वाहन रेंट-अ-कॅब म्हणून देणाऱ्यांवर १० हजार रुपयांचा दंड लावला जाईल तसेच त्यांचे वाहन देखील जप्त करण्यात येणार आहे.
राज्यात परिवहन मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात पांढरी नंबरप्लेट असलेली खासगी वाहने वैध परवान्याशिवाय रेंट-अ-कॅब म्हणून दिली जात आहेत आणि अशाप्रकारे अवैध वाहने चालवणे रेंट-अ-कॅब योजना १९८९ आणि मोटार वाहन कायदा १९८८ यांच्या विरुद्ध आहे, कायद्याचे उल्लंघन आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
एवढंच नाही तर हा गुन्हा वाहन जप्तीला देखील कारणीभूत ठरू शकतो. पर्यटकांनी देखील अनधिकृत वाहनांचा वापर करू नये कारण अशा वाहनांमुळे चालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. पर्यटकांनी केवळ काळी नंबरप्लेट असलेली वाहनं वापरावीत असे या यादेशात म्हटले आहे.
गोव्यातील रस्ते अपघातांची वाढती संख्या चिंताजनक बनली आहे, विशेषत: पर्यटकांकडून स्थानिक रेंट-अ-कॅब व्यवयसायिकांकडून भाड्याने घेतलेल्या वाहनांमुळे होणारे अपघात वाढले आहेत. या अपघातांमध्ये पर्यटकांकडून निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या घटनांचा समावेश आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यामुळे गंभीर जखमा आणि मृत्यूच्या घटनाही उघडकीस येत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत गोवा वाहतूक संचालनालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संचालनालयाने एक सूचना जारी करत नवीन 'भाड्याने टॅक्सी' (Rent-a-Cab) परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती लावली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.