Goa second rank fiscal health index Dainik Gomantak
गोवा

Fiscal Health Index: गोव्‍यासाठी खूशखबर! आर्थिक आरोग्‍य निर्देशांकात यंदा दुसरा क्रमांक; CM सावंतांनी केला अहवाल सादर

Goa second rank fiscal health index: नीती आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात गोव्‍याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : नीती आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात गोव्‍याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभा सभागृहात आयोगाचा हा अहवाल सादर केला.

नीती आयोगाने सलग दुसऱ्यांदा देशातील सर्वच राज्यांच्‍या आर्थिक आरोग्याचे स्थैर्य दर्शवणारा निर्देशांक जारी केला. यात ७३.१ गुणांसह ओडिशा राज्‍य पहिल्‍या स्‍थानी आहे. ५४.७ गुणांसह गोवा दुसऱ्या तर ५०.५ गुणांसह झारखंडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ चा महालेखापाल (कॅग) अहवाल व राज्य सरकारांनी जारी केलेल्या विविध आर्थिक अहवालांवरून नीती आयोगाने हा अहवाल तयार केला आहे.

गतवर्षी गोवा या क्रमवारीत तिसऱ्या स्‍थानी होता. यंदा मात्र गोव्‍याने प्रगती करताना दुसरा क्रमांक प्राप्‍त केला आहे. गतवर्षी ओडिशा पहिल्‍या तर छत्तीसगड दुसऱ्या स्‍थानावर होते. परंतु, यंदा छत्तीसगडला सहावा क्रमांक प्राप्‍त झालेला आहे.

‘या’ गटात गोवा देशात पहिला

राज्‍यांच्‍या खर्चाची गुणवत्ता, महसूल गोळा करण्‍यासाठीची कर प्रणाली, आर्थिक शिस्‍त, कर्जाचा निर्देशांक आणि कर्जाची स्‍थिरता अशा गटांमध्‍ये राज्‍यांना गुण देण्‍यात येतात. त्‍यानुसार, गोव्याने खर्चाची गुणवत्ता दाखवण्‍यात ४९.५, महसूल गोळा करण्याच्या करप्रणालीत ८०.४, आर्थिक शिस्‍तीत ४५, कर्जाच्या निर्देशांकात ५६.८, तर कर्ज स्थिरता गटात ४१.९ गुण प्राप्‍त केल्‍याचे अहवालातून दिसून येते. यात महसूल गोळा करण्‍याच्‍या कर प्रणालीत गोवा देशात पहिल्‍या स्‍थानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT