Goa Happiness Index: 'गोव्यातील लोक आनंदी जीवन जगत आहेत'! 'हॅपिनेस इंडेक्स' वाढल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Goa Happiness Index: गोव्यातील लोक आनंदी जीवन जगत असल्याचे समोर येत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
Goa happiness index increasing
Goa happiness index increasingDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: गोव्याचा ‘आनंदी निर्देशांक’ वाढत असून लोकांच्या आनंदी जीवनाचे मोजमापन करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. अन्य कोणत्याही राज्यात असा उपक्रम हाती घेतला नाही. केवळ गोव्यातच लोकांचा आनंदी निर्देशांक तपासण्यात येतो. त्यातून गोव्यातील लोक आनंदी जीवन जगत असल्याचे समोर येत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

लोकांना आनंदी व प्रसन्न ठेवण्यात रवींद्र भवनसारख्या कलाभवनात होणाऱ्या कार्यक्रमांचे मोठे योगदान आहे. साखळी रवींद्र भवन त्यात आघाडीवर आहे, असे सावंत पुढे म्हणाले.

दर्जेदार कार्यक्रमांमुळे साखळीतील रवींद्र भवन नेहमी चर्चेत असते. याचे श्रेय रवींद्र भवनचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर कार्यकारीणीला जाते. याची दखल घेत रसिकांनी आभार मानण्यासाठी विशेष कार्यक्रम घडवून आणण्याची मागणी केली होती.

त्यानुसार ‘टी विथ डॉ. प्रमोद सावंत’ हा विशेष कार्यक्रम नुकताच रवींद्र भवनात घडवून आणण्यात आला. संपूर्ण गोव्यातील सरकारी अस्थापनांमध्ये ही वास्तू अव्वल आहे. त्यामुळे या रवींद्र भवनला शेजारील राज्यांमधील लोकांचीही पसंती असून महाराष्ट्र तसेच बेळगावसारख्या भागातून काही कंपन्या, खासगी अस्थापने, संस्था या रवींद्र भवनमध्ये आपल्या मोठ्या बैठका, परिषदा, कार्यक्रम आयोजित करतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Goa happiness index increasing
Goa Politics: 'वीरेश बोरकरना पोलिसांनी का हटवले'? CM सावंतांनी दिले उत्तर; लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत केले आवाहन

यावेळी दया तेंडुलकर, मधुकर पाटणेकर, अंजली हळर्णकर, संतोष भगत, नरेश पेडणेकर, आश्विनी पटवर्धन, मयुर कंटक, नरेश दातये व इतरांनी विचार मांडले.

Goa happiness index increasing
CM Sawant At Abu Dhabi: मुख्यमंत्री सावंतांची दुबईतील 'रेसिंग ट्रॅक'ला भेट, गोवा मोटार स्पर्धांचे केंद्र बनवण्याचा विश्वास व्यक्त

लवकरच रेकॉर्डिंग स्टुडिओ व सुविधा

रवींद्र भवनचा दर्जा वाढल्याने रसिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे मनोरंजनात्मक सोयी सुविधा वाढवण्यात येणार आहेत. लवकरच खुल्या सभागृहाच्या ठिकाणी दोन चित्रपट थिएटर, मुलांसाठी खेळ उद्यान, पार्टी किंवा अन्य कार्यक्रमांसाठी छोटे सभागृह, लग्न सोहळ्यांसाठी प्रशस्त सुमारे ८०० आसन क्षमतेचा सभागृह, रेकॉर्डींग स्टुडिओ तसेच रवींद्र भवनच्या वरील भागात केफेटेरीया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सावंत यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com