Goa Rainfall on 28th of June 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्यात अतिवृष्टी! गेल्या 24 तासात बरसला 133.9 मिलिमीटर पाऊस; सरासरी 349 टक्के अधिक

26 जूनपर्यंत झाला होता 40 टक्के कमी पाऊस; एकाच दिवसात भरून काढली सरासरी

Akshay Nirmale

Goa Rainfall on 28th of June 2023: गोव्यात पावसाला यंदा वेळाने सुरवात झाली. त्यामुळे 1 जून ते 26 जून या कालावधीत गोव्यात एकंदरित 40 टक्के कमी पाऊस झाला होता. पण, बुधवारी 28 जून रोजी एकाच दिवसात गोव्यात 349 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

या दिवशी गोव्यात सरासरी 29.8 मिलीमीटर पाऊस होत असतो पण 28 जून रोजी गोव्यात 133.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.

(IMD, IMD Goa)

Goa Rainfall on 28th of June 2023

जिल्हानिहाय विचार करायचा झाल्यास उत्तर गोव्यात 28 जून रोजी 133.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या दिवशी उत्तर गोव्यात सरासरी 32.5 मिलीमीटर पाऊस होतो. म्हणजेच जिल्ह्यात एका दिवसात 312 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

दक्षिण गोवा जिल्ह्याचा विचार करता येथे 134 मिलीमीटर पाऊस दिवसात झाला असून एरवी हे प्रमाण सरासरी 27.5 मिलीमीटर असते. म्हणजेच दक्षिण गोवा जिल्ह्यात आज, बुधवारी 387 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

दरम्यान, या महिन्यातील 1 जून ते 26 जून या कालावधीतील पावसाच्या आकडेवारीकडे पाहिल्यास या काळात गोवा राज्यात 502.6 मिलीमीटर पाऊस झाल्याचे दिसून येते. तर एरवी या कालात राज्यात 833.1 मिलीमीटर पाऊस होत असतो. त्यामुळे एकंदरित राज्यात 40 टक्के कमी पाऊस झाला आहे.

जिल्हानिहाय विचार करता उत्तर गोव्यात 1 जून ते 26 जून या कालावधीत 458.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे. एरवी हे प्रमाण 846 मिलीमीटर असते. म्हणजेच या जिल्ह्यात या काळात 46 टक्के कमी पाऊस झाला आहे.

तर दक्षिण गोव्यात या काळात 821.7 मिलीमीटर पाऊस होत असतो. पण यंदा तो 541.9 मिलीमीटर झाला आहे. म्हणजेच दक्षिण गोव्यातील पावसात या काळात 34 टक्के घट दिसून आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT