Boxer Pushpendra Rathi: बलात्काराचा आरोप असलेल्या बॉक्सर पुष्पेंदर राठीला जामीन मंजूर

गोव्याचे प्रतिनिधीत्व करणारा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू
Boxer Pushpendra Rathi
Boxer Pushpendra RathiDainik Gomantak
Published on
Updated on

Boxer Pushpendra Rathi get bail: राष्ट्रीय पदक विजेता बॉक्सर आणि बलात्कार प्रकरणातील संशयित पुष्पेंदर राठी (22) याला जामिन मंजूर झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोन दिवसांपुर्वीच अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात पोलिस त्याची चौकशी करत होते. दरम्यान, आज, बुधवारी पणजी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याला जामिन मंजूर केला. लैंगिक अत्याचार प्रकरणात त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तो मूळचा हरियाणाचा आहे पण तो गोव्याचे प्रतिनिधीत्व करत होता. तक्रारदार तरुणीदेखील बॉक्सर आहे. पीडीतेशी जवळीक करून पुष्पेंदर याने मैत्री वाढविली. तिला लग्नाच्या भूलथापा देऊन ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 याकाळात हॉटेलात नेऊन लैंगिक अत्याचार केले होते. लग्नाचा विषय काढताच त्याने पीडीतेला झिडकारले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Mala Lake Fish Mortality Case
Goa teacher sentenced 11 years
Bombay High Court Goa Bench
bombay high court goa bench suo motto
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com