Goa agriculture news Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पहिल्याच पावसात 'रस्ता' गेला वाहून; केरये-खांडेपारमध्ये शेतात घुसली माती, बळीराजा हवालदिल

Kerye Khandepar road collapse: पाऊस शेतकऱ्यांचं नुकसान करत असल्याचं चित्र समोर आलं आहे. केरये -खांडेपार येथील शेतात घुसलेल्या पाण्याच्या झोतात माती वाहून आली

Akshata Chhatre

फोंडा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर सुरूच आहे. पावसाने पकडलेला हा जोर काही शेतकऱ्यांना रुचणारा वाटत नाही, याउलट पाऊस शेतकऱ्यांचं नुकसान करत असल्याचं चित्र समोर आलं आहे. केरये -खांडेपार येथील शेतात घुसलेल्या पाण्याच्या झोतात माती वाहून आली आहे.

रस्त्याचे रुंदीकरण करताना बांधकाम खात्याने शेतकऱ्यांसाठी खास माती घालून हा रस्ता तयार करून दिला होता, मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता काही तग धरू शकलेला नाही आणि परिणामी बांधकाम खात्याने शेतात पडलेली माती काढून देण्याची शेतकरी मागणी करत आहेत.

तुकाराम गावडे नावाच्या एका स्थानिक शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थानिक लोकं शेती करतात, मात्र सध्याच्या या परिस्थितीत माती वाहून थेट शेतात आल्याने यंदाच्या वर्षी शेती करता येईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बांधकाम विभागाकडून माती आणि खाडीपासून हा रस्ता बांधून देण्यात आला होता, शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा देखील व्हायचा मात्र वाढत्या पावसात हा रस्ता तग धरू शकलेला नाही आणि नुकसान झालं आहे.

रस्ता वाहून गेल्याने शेतांकडे जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे. मोठ-मोठ्या गाड्या देखील खाली शेतांपर्यंत घेऊन जाणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालंय, परिणामी सरकारने रस्ता बांधून द्यावा शेतात पसरलेली माती काढून द्यावी अशी मागणी केली जात आहे. या भागातील कित्येक शेतकऱ्यांनी अनेक कारणांमुळे शेती करणं सोडून दिलंय, मात्र जे बाकी आहेत आणि शेती करण्यात इच्छुक आहेत त्यानं मदत मिळावी अशी मागणी केली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT