Goa Rain: राज्यात पावसाची धुवांधार बॅटिंग; अनेक ठिकाणी झाडे कोसळली अन् विद्युत पुरवठा खंडित

Rain In Goa: राज्यात मंगळवार पासून पडत असलेल्‍या मुसळधार पावसाने बुधवारीही राज्‍याला झोडपून काढले. पावसाची तीव्रता पाहता गोवा वेधशाळेने पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
Goa Rain
Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात मंगळवार पासून पडत असलेल्‍या मुसळधार पावसाने बुधवारीही राज्‍याला झोडपून काढले. पावसाची तीव्रता पाहता गोवा वेधशाळेने पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घ्‍यावी आणि शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. दरम्‍यान, संध्‍याकाळी उशिरा पावसाने किंचित विश्रांती घेतली.

झाड कोसळून १० दुचाकींचे नुकसान

पणजीतील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेले भले मोठे झाड रस्त्यावर कोसळले. तेथे उभ्‍या करून ठेवलेली १० दुचाकी वाहने या झाडाखाली चिरडली गेली. त्‍यामुळे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी टळली.

Goa Rain
Goa Safety Campaign: महिलांनो, निर्धास्त प्रवास करा; पणजीचा महापौर आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते 'हेल्पलाइन स्टिकर' मोहीम

सुरक्षेसाठी ‘दूधसागर’वर प्रवेश बंद

जोरदार पावसाच्‍या पार्श्‍वभूमीवर ‘दूधसागर’ धबधब्‍यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी ट्रेकिंग तसेच धबधब्यांवर जाणे टाळावे, असे अवाहनही करण्‍यात आले आहे. आकस्मिक पाण्याचा प्रवाह वाढणे, दरड कोसळणे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेला पहिल्यांदा प्राधान्य द्यावे, असे आवाहन वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केले आहे.

Goa Rain
Corona In Goa: वास्कोत आढळला कोरोनाचा रुग्ण? मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू

किनारपट्टीवर घोंगावताहेत चक्रीय वारे

कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीच्‍या भागात चक्रीय वारे घोंगावत आहेत. त्‍या प्रभावातून कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसाचा जोर आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मच्‍छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्‍यात आलाय.

मदतीसाठी क्रमांक जारी

पूर तसेच भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्‍या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच आवश्यक सावधगिरीसाठी ‘सचेत’ ॲप डाऊनलोड करावे. सोबतच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ०८३२-२४१९५५०, ०८३-२२२५३८३, ०८३२-२७९४१०० किंवा ११३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com