goa rain video Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Valpoi Sattari Heavy Rain: सायंकाळी सत्तरी तालुक्यात केवळ काही वेळेसाठी कोसळलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडवली

Akshata Chhatre

सत्तरी: राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असली तरी, सत्तरी तालुक्यात या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सत्तरी तालुक्यात केवळ काही वेळेसाठी कोसळलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडवली. वादळी वाऱ्यामुळे पाली सत्तरी तसेच रेडेघाटी येथे रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे तातडीने अग्निशमन दलाला मदतीसाठी धाव घ्यावी लागली.

वाळपईत ढगफुटीसदृश परिस्थिती, जनजीवन विस्कळीत

सत्तरीतील वाळपई शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे वाळपई आरोग्य केंद्रासमोर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. यामुळे रुग्ण आणि सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

पणजीत ३० मिनिटांत दोन इंच पाऊस

राज्यात सध्या तुरळक प्रमाणात पाऊस पडत असतानाच, शुक्रवारी (दि. १०) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पणजीत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. केवळ अर्धा तासात तब्बल ६० मिमी (दोन इंच) पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली आणि पणजीतील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले.

रात्री पडलेल्या या आकस्मिक पावसामुळे वाहनचालकांना काही काळ वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला. तसेच, पणजी स्थानकांवर साचलेले पाणी सकाळपर्यंत तसेच होते. दरम्यान, गोवा वेधशाळेने पुढील चार दिवस राज्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Decision: गेम चेंजर निर्णय! हरमनप्रीतने सांगितला 'तो' एक क्षण, ज्यामुळे टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप' चॅम्पियन

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

Goa Today's News Live: कोकणीचे प्रमाणीकरण करण्याची घाई करु नये; नरेंद्र सावईकर

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

SCROLL FOR NEXT