monsoon rainfall in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: मान्सून म्हणतोय,"राम राम"! गोव्यात पावसाचा जोर घटला; ऑक्टोबर हीटची चाहूल

Goa weather update: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाची तीव्रता लक्षणीयरीत्या मंदावली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सरासरी घटली; 'ऑक्टोबर हीट'ची चाहूल

साधारणपणे जून ते सप्टेंबर हा कालावधी मान्सूनचा असतो, तो आता संपुष्टात आला आहे. राज्यात मागील २४ तासांत केवळ १५.७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून सर्वसामान्यपणे १० ते २० ऑक्टोबर दरम्यान गोव्यातून पूर्णपणे माघार घेतो. त्यामुळे आता पावसाचे प्रमाण कमी होत जाऊन लवकरच 'ऑक्टोबर हीट' अर्थात उन्हाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

गणेश चतुर्थीनंतर पावसाचे चढ-उतार

यावर्षी गणेश चतुर्थीच्या काळात अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण मिळाले होते आणि पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. मात्र, चतुर्थी संपल्यानंतर पावसाच्या प्रमाणात घट झाली.

त्यानंतरही गेल्या पाच ते सहा दिवसांत काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. या बदलांमुळे हवामान विभागाने यापूर्वी पुढील पाच दिवसांसाठी राज्यात 'यलो अलर्ट' देखील जारी केला होता, परंतु आता पावसाचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या २४ तासांतील प्रमुख नोंद

राज्यात गेल्या २४ तासांत काही तालुक्यांमध्ये तुलनेने चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये पेडणे (३४.८ मिमी) आणि म्हापसा (३२ मिमी) या तालुक्यांनी सर्वाधिक पावसाची नोंद करत आघाडी घेतली.

इतर प्रमुख नोंदी (मिमीमध्ये):

  • काणकोण: २३.२ मिमी

  • सांग: २१.० मिमी

  • धारबांदोडा: १७.४ मिमी

  • मुरगाव: १४.२ मिमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ब्रिटिशांच्या पक्षाने देशभक्ती शिकवू नये!', BJYM अध्यक्षांनी काँग्रेसला सुनावलं; Watch Video

Charter Flight: पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात! रशियातून पहिले चार्टर विमान मोपा विमानतळावर दाखल; गोव्याचे पारंपरिक आदरातिथ्य

Bethora Road Issue: बेतोड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Goa Politics: खरी कुजबुज, मायकल जागे झाले!

Asia Cup Controversy: पाकडे रडतच बसणार... "कप देतो, पण माझ्याकडूनच घ्यावा लागेल" नक्वींचा बालहट्ट काय

SCROLL FOR NEXT