Goa Fishing Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing : 'आम्ही खायचे काय'? गोव्यातले पारंपरिक मच्छिमार संकटात; खराब हवामानाचा मासेमारीला फटका

Goa Rain Impact : ऑक्टोबर ते नोव्हेंबर हे महिने लहान मोटार बोटींच्या मासेमारीसाठी पोषक असतात. मात्र, या बोटधारकांवर यंदा मासेमारीऐवजी घरी बसण्याची वेळ निर्माण झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: मच्छीमारीवरील बंदी उठल्यानंतर समुद्रपूजन म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यात मासेमारीला सुरुवात होते. मात्र, यंदा सप्टेंबर महिन्याचे दहा दिवस वगळता मच्छीमारांना समुद्रात चक्रीवादळ व अन्य कारणांमुळे मासेमारी करता आलेली नाही.

कोळंबीच्या मच्छीमारीचा मोसम वाया गेला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला त्यामुळे सुमारे पंधरा दिवस व‌ आता नोव्हेंबर महिन्याची सुरुवात वाया जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हे महिने लहान मोटार बोटींच्या मासेमारीसाठी पोषक असतात. मात्र, या बोटधारकांवर यंदा मासेमारीऐवजी घरी बसण्याची वेळ निर्माण झाली आहे, असे अखिल गोवा क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष रुद्रेश नमशीकर यांनी सांगितले.

ज्यांचे आपत्कालीन नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. ती सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी वादळी वारा व पाऊस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १ लाख ४० हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्याचे जाहीर केले आहे. पावसामुळे गळती झालेल्या सुपारी बागायतदारांना नुकसानभरपाईची तजवीज आहे.

मात्र, मत्स्यव्यावसायिकांचे पोट ज्या समुद्रावर चालते त्या समुद्राचे पोट सध्या हवामान बदलामुळे बिघडत चालले आहे. यंदा मासेमारी हंगाम सुरू होऊन फक्त तीन महिने उलटले आहेत. या तीन महिन्यांतील मासेमारीवर संपूर्ण वर्ष मच्छीमारांचे पोट चालत असते. मात्र या तीन महिन्यांपैकी छोट्या बोटमालकांना फक्त पंधरा दिवसच मासेमारी करता आली आहे.

सरकारने मदत योजना जाहीर करावी!

मत्स्यव्यावसायिकांचा धंदा संपूर्णपणे समुद्राच्या आरोग्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून छोट्या बोटमालकांना अपेक्षित मासेमारी करता येत नाही. मोठ्या बोटी, एलईडी मासेमारी यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

मोठ्या बोटी यावर मात करून खोल समुद्रात मासेमारी करतात. सरकारने या आपत्तीकाळात छोटे बोटमालक, पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांसाठी मदत योजना जाहीर करण्याची मागणी काणकोणचे माजी नगराध्यक्ष दयानंद पागी यांनी केली आहे.

मच्छीमारांसह कामगारांचेही आर्थिक हाल

मुख्यमंत्र्यांनी वादळी वारा व पाऊस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १ लाख ४० हजारांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. मात्र, मच्छीमारांच्या साठी अशाप्रकारची मदत जाहीर करणे गरजेचे आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मच्छीमारांना जेव्हा मासेमारी करता येत नाही, तेव्हा त्यांचे नुकसान होतेच, शिवाय कामगारांचेही आर्थिक हाल होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: टीप मिळाली अन् आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश झाला! 1000 कोटींच्या सायबर घोटाळ्याचं 'चीन कनेक्शन'; 4 चिनी नागरिकांसह 17 जणांवर गुन्हा दाखल

Viral Video: अक्षय खन्नावर पाकिस्तान फिदा! 'FA9LA' हुकस्टेपचा बलुची पोरांना फीव्हर; फॅनबेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

VIDEO: चालत्या कारला केलं लक्ष्य, बॉम्ब थेट गाडीवर आदळला, 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचा मास्टरमाईंड 'राद साद' ठार; इस्रायली सैन्याने हवाई हल्ल्यात घेतला बदला

'गोव्यात हफ्ता दिल्याशिवाय धंदा चालत नाही', रोमिओ लेन दुर्घटनेवरून केजरीवालांचा भाजप सरकारवर हल्ला

IND vs SA: अभिषेक शर्मा बनणार टीम इंडियाचा नवा 'रन मशीन'! किंग कोहलीचा 9 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड धोक्यात; कराव्या लागणार 'इतक्या' धावा

SCROLL FOR NEXT