Margao Fish Market: मडगाव मासळी मार्केटची इमारत बनली दारूअड्डा! उदघाटनापूर्वीच विक्री सुरू; देखरेख मागणी

Margao Fish Market Building: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई सांगतात, त्याप्रमाणे बांधकाम चांगले झाले आहे. त्यात ज्या साधनसुविधा व शौचालये वगैरे तयार केली आहेत, ती पंचतारांकित हॉटेलच्या दर्जाची आहेत.
Margao Fish Market
Margao Fish MarketDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: करोडो रुपये खर्च करून मडगावात बांधलेल्या घाऊक मासळी मार्केटची स्थिती उद्‌घाटनापूर्वीच अगदी बिकट झाली आहे. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई सांगतात, त्याप्रमाणे बांधकाम चांगले झाले आहे. त्यात ज्या साधनसुविधा व शौचालये वगैरे तयार केली आहेत, ती पंचतारांकित हॉटेलच्या दर्जाची आहेत.

पण त्याची देखरेख करण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी कोणीही नसल्याने या घाऊक मासळी मार्केट इमारतीचा वापर बेकायदेशीर कामासाठी केला जात असल्याचे दिसून आले आहे.

उदघाटनापूर्वीच येथे मासळी विक्रेत्यांनी जागा बळकावल्या आहेत. तेथे राजरोसपणे मासे विक्री सुरू केली आहे. या इमारतीचा परिसर अस्वच्छ व दुर्गंधी आहेच. त्यातच भर म्हणून आता या इमारतीचा वापर दारूच्या अड्ड्यासाठी वापरला जात असल्याचे पुरावे दिसत आहेत. खिडक्यांवर, पायऱ्यांवर दारूच्या बाटल्या आढळतात.

Margao Fish Market
Maragao: मडगाव पालिकेला 5.39 कोटींची वित्तीय तुट! अर्थसंकल्प सादर; भरपाईसाठी विरोधकांचा करवाढीला विरोध

जोपर्यंत देखरेख व हाऊसकिपिंग कंपन्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत या मासळी विक्री इमारतीचे उदघाटन करून काहीच उपयोग नसल्याचे ठाम मत आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.

Margao Fish Market
Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

मंगळवारी होणार बैठक

या इमारतीत चाळीस कचेऱ्या व दुकानांसाठी खोल्या आहेत. त्यातील चार मत्स्यव्यवसाय खात्याला द्याव्या लागतात. बाकी ३६ दुकाने भाडे तत्त्वावर द्यावीत किंवा त्यांचा लिलाव करावा. त्यातून येणाऱ्या महसुलाचा वापर देखरेख व हाउसकिपिंगसाठी वापरावा, अशी सूचना सरदेसाई यांनी केली आहे. घाऊक मासळी मार्केट इमारतीसंदर्भात मासेमारी व्यवसायासंदर्भातील संबंधितांची गुरुवारची बैठक पुढे ढकलण्यात आली. ती आता मंगळवारी होणार आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com