Yellow Alert in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: राज्यात सरी बरसणार! वादळी वाऱ्यासाह पाऊस लावणार हजेरी; तीन दिवसांसाठी यलो अलर्ट

: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय

Akshata Chhatre

पणजी: राज्यात यंदाच्या वर्षी पाऊस लवकरच धडक देण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. यापूर्वी देखील हवामान खात्याने गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे.

गोवा हे किनारी राज्य असल्याने इथे नेहमीच पावसाचा तडाखा अधिक असतो. १३ मे ते १६ मे २०२५ पर्यंत गोव्यात काही ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वादळ येण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हवामान खात्याकडून गोव्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याची विनंती

उत्तर गोव्यातील पणजीत सोमवारी  कमाल ३५.५ अंश, तर किमान २७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर दुसऱ्या बाजूला मुरगावमधील कमाल तापमान ३५ अंश आणि किमान तापमान २६.८ अंश सेल्सिअस होते.

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू झालाय आणि आता हा पाऊस आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज्यात आत्तापर्यंत सरासरी १३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. या दरम्यान वाऱ्याचा वेग देखील अधिक असण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याची विनंती केली जातेय.

मान्सून गोव्यात येणार

यंदाच्या वर्षी 13 मे पर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबर येथे धडक देईल अशी माहिती समोर आली होती. दक्षिण अरबी समुद्रासह अंदमानमध्ये यायला हवामान अनुकूल असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT