Goa Weather: देशातील सर्वाधिक उष्ण राज्य 'गोवा'! धक्कादायक माहिती उघड; ‘फील्स लाईक’ तापमान 47.8°C

Goa Temperature: तुलनात्मकदृष्ट्या, दिल्लीत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस होते; परंतु तिथे उष्णता निर्देशांक ३९ ते ४० अंश सेल्सिअस इतकाच राहिला.
Goa Summer
Goa Weather UpdateCanva
Published on
Updated on

पणजी: गोवा यंदाच्या उन्हाळ्यात देशातील सर्वांत उष्णतेने त्रस्त भागांपैकी एक म्हणून समोर आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, गोव्यात ‘फील्स लाईक’ म्हणजेच अंगावर जाणवणारे तापमान तब्बल ४७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, जे देशातील सर्वाधिक आहे.

बुधवारी गोव्यात प्रत्यक्ष कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस होते; पण दमट हवामानामुळे उष्णतेचा त्रासदायक परिणाम प्रचंड वाढला. या उष्मा निर्देशांकाने जास्त तापमान नोंदवणाऱ्या राज्यांनाही मागे टाकले.

तुलनात्मकदृष्ट्या, दिल्लीत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस होते; परंतु तिथे उष्णता निर्देशांक ३९ ते ४० अंश सेल्सिअस इतकाच राहिला. भोपाळमध्ये जरी ३८ अंश तापमान गाठले असले तरी तिथे ‘फील्स लाईक’ तापमान केवळ ३४ अंश होते.

Goa Summer
Goa Weather Update: आर्द्रतेमुळे राज्यात उष्म्याच्या झळा वाढल्या; तापमान 34 अंशांवर, गोमंतकीय हैराण

शेजारील बेळगावने ३३ अंश तापमानासह ३८.१ अंश ‘फील्स लाईक’ नोंदवले, तर केरळमध्ये केवळ ३१.२ अंश कमाल तापमान असूनही तसाच उष्णता निर्देशांक नोंदवला गेला. सध्या तरी उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील आठवड्यात राज्यातील तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Goa Summer
Goa Weather Update: सत्तरी, धारबांदोड्याला पाऊस झोडपणार? 'कोसळधार' बरोबर वादळी वाऱ्याची शक्यता

उत्तर-दक्षिण द्रोणीमुळे उष्मा

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गोव्यातील ही प्रचंड उष्णता एका उत्तर-दक्षिण द्रोणीमुळे उदभवली आहे, जी वरच्या स्तरावरील चक्रिय वाऱ्यांच्या प्रणालीशी संबंधित आहे. ही प्रणाली सुमारे १.५ किमी उंचीवर, दक्षिण-पश्चिम राजस्थानपासून उत्तर केरळपर्यंत विस्तारलेली आहे आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आर्द्रता अडकवते आहे. यामुळे गोव्यात उष्णतेचा त्रास अधिक वाढतो आहे.

Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak

महाराष्ट्रात ‘फील्स लाईक’ कमीच

गुजरातमध्येही जरी उष्णतेची लाट जाणवत असली, तरी बहुतांश ठिकाणी ‘फील्स लाईक’ तापमान ४० अंश पेक्षा कमीच राहिले. भुज हे एकमेव ठिकाण होते जेथे ते ४० अंशांवर पोहोचले. महाराष्ट्रातील अनेक हवामान केंद्रांनी गोव्यापेक्षा किंचित जास्त प्रत्यक्ष तापमान नोंदवले; पण कुठेही ‘फील्स लाईक’ तापमान ४२ अंश ओलांडले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com