Goa Railway Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: काणकोण रेल्वेस्थानकावर तीनपैकी दोन लांबपल्ल्याच्या गाड्यांना ‘थांबा’

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी काणकोण रेल्वे स्थानकावर तीनपैकी दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचे आश्वासन सभापती रमेश तवडकर यांना दिल्ली येथे दिले.

दैनिक गोमन्तक

Goa Railway: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी काणकोण रेल्वे स्थानकावर तीनपैकी दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचे आश्वासन सभापती रमेश तवडकर यांना दिल्ली येथे दिले. यासंदर्भात सभापती रमेश तवडकर, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर व गोवा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शंभा नाईक गावकर यांनी दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

यावेळी रेल्वे मंत्री वैष्णव यांनी तीन गाड्यांपैकी दोन गाड्यांना ताबडतोब थांबा देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित एका गाडीला थांबा देण्यासाठी दोन-तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभापतींना सांगितले. सध्या या मार्गावरील काही रेल्वे गाड्या 6 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत मंगळूर सेक्टर मध्ये रेल्वे मार्गाचे नूतनीकरण करण्यात येत असल्याने बंद आहेत.

पटवून दिले महत्त्व

सभापती तवडकर यांनी रेल्वे मंत्र्यांना मोपा विमानतळामुळे काणकोणच्या पर्यटनावर परिणाम झाला आहे. त्यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देणे पर्यटक व स्थानिकांच्या रहदारीसाठी महत्त्वाचे असल्याचे रेल्वे मंत्र्यांना पटवून दिले.

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी काणकोणवासीयांनी कोरोना महामारीनंतर प्रयत्न चालू केले होते. मात्र, सभापतींनी प्रत्यक्ष रेल्वे मंत्र्यांची दिल्लीत भेट घेऊन ही मागणी धसास लावल्याचे सांगितले. - रमाकांत नाईक गावकर, नगराध्यक्ष, काणकोण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT