Sanguem Municipality: सांगे पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक

सांगे नगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे गेले तीन महिने कर्मचाऱ्यांना वेतनही देण्यात आलेले नाही.
Sanguem Municipality
Sanguem MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Sanguem Municipality: सांगे नगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे गेले तीन महिने कर्मचाऱ्यांना वेतनही देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीमुळे कामगार वर्गाला त्यांचा उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे. पालिकेच्या या कारभाराला कर्मचारी कंटाळले आहेत.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांतून एकदा फक्त एक महिन्याचा पगार दिला जातो. त्यातून त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवाव्या लागतात.

दुकानदारांकडून व औषधालयांतून उधारीवर साहित्य आणावे लागत आहे. उधारी फेडण्यास उशीर होत असल्याने आतातर त्या दुकानदारांनीही उधार साहित्य देणे बंद केल्याने या कर्मचाऱ्यांची अवस्था खूप बिकट झाली आहे.

Sanguem Municipality
School Education: पायाभूत शिक्षण : शालेय शिक्षणाचा कणा

कामगारांच्या हाती दैनंदिन खर्च करण्याइतकाही पैसा उरलेला नाही. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतही शिल्लक नसल्याने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पालिकेत खेपा मारून रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

घरातील लग्नसमारंभ असला तरीही भविष्य निर्वाह निधीतून पैसे मिळत नसल्याने निवृत्त कामगार वर्गातही संताप व्यक्त केला जात आहे. दर महिना पगारातून पैसे कापले जात होते तरी सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र कामगारांना परतावा म्हणून हाती एकदाच सगळे पैसे न देता थोडे थोडे दिले जात असल्यामुळे कर्जाचे व्याज कर्मचाऱ्यांना नाहक भरावे लागत आहे.

Sanguem Municipality
Goa News: ओपा - खांडेपार तिठ्यावरील नियोजित बसस्टॅाप शेड बांधकामासाठी पाहणी

बडा घर, पोकळ वासा

सांगे पालिकेचा कारभार नेहमीच उधारीवर चालला असून अद्याप पालिका आत्मनिर्भर बनलेली नाही. पालिकेची इमारत मोठी असली तरी आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. सत्ताधारी पक्षाची पालिका असूनही कामगारवर्गाला दर महिना पगार देण्यात येत नसल्याने कामगार वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

आमदारांनी लक्ष घालावे

स्थानिक आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यात लक्ष घालून कामगारांना देणे असलेली रक्कम मिळवून द्यावी व दर महिना पगार देण्याची तरतूद करावी. त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना देणे असलेली रक्कम त्वरित देण्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी सांगे पालिका कामगारांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com