पणजी: ज्या पद्धतीने दिव्यांग मुलांनी नृत्य सादर करून पर्पल फेस्टचा शुभारंभ केला ते पाहून माझे हृदय भारावले आहे. तीन वर्षापूर्वी गोव्यात पर्पल फेस्टची सुरुवात केली ज्याने दिव्यांगांच्या सर्व कलागुणांना, दिव्यांगांचे प्रश्न मांडण्यास व्यासपीठ मिळवून दिले जे इतर राज्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जगाला सर्वसामावेशकता संदेश देणारे पर्पल फेस्टची आयोजन करत दिव्यांगाना आनंद दिला असल्याचे केंद्रीयमंत्री विरेंद्र कुमार यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थानिक समन्वयक शोम्बी शार्प म्हणाले, शाश्वत विकास साधण्यात आम्ही मागे पडत आहोत. त्यासोबतच गरीबी, दिव्यांगांचे सक्षमीकरण, रोजगार असे अनेक आव्हाने देखील आपल्या समोर आहेत, असे ते म्हणाले.
पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आल्यापासून दिव्यांगाकडे पाहण्याचा, त्यांच्याबाबत विचार करण्यात बदल झाला आहे. दिव्यांग व्यक्तीबाबत संवेदनशीलता निर्माण झाली आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
दिव्यांगांमध्ये देखील अनेक कलागुण आहे आज सर्व क्षेत्रात दिव्यांग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग संबोधित सन्मानाची वागणूक दिली. दिव्यांगासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहे.
सुगम्य भारत अभियानाला प्राधान्य दिले जात असून उत्तरोत्तर पर्पल फेस्ट दिव्यांगासाठी लाभदायक ठरावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
पर्पल हा एक शब्द नसून सशक्तीकरणाचे व्यासपीठ आहे. पंतप्रधान मोदींमुळे दिव्यांग सन्मानाने जगत आहेत. लोक गोव्यात नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी येतात परंतु दिव्यांग व्यक्ती पर्पल फेस्टच्या माध्यमातून नवी जीवनाची सुरुवात करण्यासाठी येत असल्याचे बाल दिव्यांग प्रथमेश सिन्हा यांनी सांगितले.
दिव्यांगासाठी सर्व जागा सुगम्य करणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्याशी चर्चा केल्यावर, त्याच्या सहवासात असल्यावर कळते. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने देखील दिव्यांग सुलभ स्थळे करणे गरेजेची असून यासाठी खासगी कंपन्या, सरकार, संघटना आणि दिव्यांग व्यक्तींचा सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या दिव्यांग विभागाच्या सहाय्य सचिव मनमीत नंदा यांनी व्यक्त केले.
दिव्यांगासाठी सुगम्य भारत आणि डिजिटल सर्वसामावेशकता याबाबत आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या चर्चासत्रात कर्नाटकचे दिव्यांग आयुक्त दास सूर्यवंशी, गुजरातचे दिव्यांग आयुक्त वी.एस. राजपूत तसेच बेंगळूरीतील दिव्यांग संघटनेच्या कुमारी भूमिका यांनी सहभाग घेतला होता.
आयुक्त राजपूत म्हणाले, सुगम्य भारत ॲपच्या माध्यमातून सर्वाधिक तक्रारी या गुजरातमध्ये नोंदविल्या गेल्या. हा ॲप सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करत असून आम्हाला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांग मुलांना समाजात अधिक त्रास असतो, त्यांच्या दिव्यांगत्त्वामुळे तणाव, चिडचिडेपणा देखील अधिक असतो त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक संवेदनशील असणे व त्यांच्या भविष्याचा गांभिर्याने विचार करणे, योग्य धोरण राबविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघातील युनीसीफ प्रतिनिधी वंदना कांदारी यांनी केले.
दिव्यांग मुलांची सुरक्षा विषयक आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या चर्चासत्रात एनसीपीसीआरचे सदस्य सचिव संजीव शर्मा, त्रिपूरा सरकारचे अतिरिक्त सचिव तपन कुमार दास, छत्तीसगडमधील दिव्यांग स्वयंसेवक कृष्णा यादव यांनी सहभाग घेतला होता.
कांदारी पुढे म्हणाल्या की, जगभरात सर्वाधिक दिव्यांग मुलांची संख्या ही दक्षिणा आशियात आहे. भारतातही चाइल्ड केअर संस्थांमध्ये असणारी ४० टक्के मुले ही दिव्यांग आहेत. दिव्यांग मुलांचे भविष्य घडविण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. आपल्याकडे शिक्षणाच्या अनुषंगाने साधनसुविधांच्या अनुषंगाने प्रमुख भर दिला जात आहे. देशातील विविध राज्यांमध्ये दिव्यांगांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने आम्ही योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात पर्पल फेस्टचे आयोजन करणार असून या फेस्ट दरम्यान १ लाख दिव्यांगांना खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत. दिव्यांगांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे कर्नाटकचे दिव्यांग आयुक्त सूर्यवंशी दास यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.