रवींद्र भवनमध्ये महिला भजन स्पर्धेत सादरीकरण करताना श्री तिरुपती बालाजी महिला मंडळ (Goa Bhajan Competition) Dainik Gomantak
गोवा

Goa: पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती महिला विभाग भजन स्पर्धा संपन्न

कोविडमुळे या वर्षी फक्त महिला व पुरुष गटांच्या स्पर्धा (Goa Bhajan Competition)

Dainik Gomantak

Pt. Manoharbuwa Shirgaonkar Smriti Bhajan Competition:

कला अकादमी आयोजित ४१ वी पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती भजन स्पर्धा (Goa Bhajan Competition) या वर्षी राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे (Art & Culture Minister Govind Gawade) यांनी घेण्यासाठी पुढाकार घेऊन सदर स्पर्धेचे रवींद्र भवन साखळी राजीव गांधी कला मंदिर फोंडा, कला व संस्कृती संचालनालय पणजी, श्री संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय सभागृह पेडणे, रवींद्र भवन मडगाव आणि रवींद्र भवन कुडचडे, रवींद्र भवन बायणा आदी ठिकाणी आयोजन करण्यात आलेल आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून विभागीय फेरीला प्रारंभ झाला आहे. गेल्या वर्षी कोविडमुळे ही स्पर्धा घेता आली नाही. यावर्षी ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. अखेर ही स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी स्पर्धेच्या स्वरूपात ठराविक बदल करून कोविडमुळे पथकातील सहभागी कलाकारांची संख्या कमी करण्यात आली व कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १२ कलाकारांना सहभागी होण्याची मुभा देण्यात आली. त्याबरोबर यावर्षी फक्त महिला व पुरुष गटाच्या स्पर्धा होतील.

दरम्यान महिला कलाकारांची पाचव्या केंद्रावरील शेवटचे सत्र आज वास्कोत रवींद्र भवन बायणा येथे पार पडले. या शेवटच्या सत्रात एकूण सात महिला भजनी पथकांना (Goa Ladies Bhajan Squad) सामाविष्ट करण्यात आले होते. यातच श्री ईश्वटी ब्राह्मण भजनी मंडळ (हेडलँड) सडा, गजानन बोगदेश्वर भजनी मंडळ (बोगदा), श्री राष्ट्रोळी संतोषीमाता भजनी मंडळ (नवेवाडे) श्री तिरूपती बालाजी भजनी मंडळ (हेडलँड सडा), श्री रुमडेश्वर दत्तात्रय भजनी मंडळ (रुमडावाडा), लक्ष्मीनारायण भजनी मंडळ (सडा) व शिवसमर्थ सांस्कृतिक भजनी मंडळ (वास्को नवेवाडे) वास्को, आदी पथकांचा समावेश होता.

महिला भजनी स्पर्धेच्या शेवटच्या सत्राचे उद्घाटन रवींद्र भवन बायणाचे (Ravindra Bhavan Baina) अध्यक्ष जयंत जाधव यांनी दीपप्रज्वलन करून केले. यावेळी व्यासपीठावर रवींद्र भवनचे कार्यक्रम अधिकारी बरेश नाईक, व्यवस्थापक अरुण लोलयेकर, कला अकादमीचे (Kala Academy Goa) कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर, परीक्षक दिगंबर कोलवाळकर, श्रीपाद गावणेकर, प्रेमानंद काळशावकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन संजय गावकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT