Goa: कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती घडविणारे मनोज

Goa: काणकोणातील एकमेव मूर्तिकार : वजनाला हलक्‍या, पर्यावरणपूरक असल्‍याने भक्‍तांची पसंती
Goa: Manoj Prabhugaonkar With Son.
Goa: Manoj Prabhugaonkar With Son.Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : कागदाच्या लगद्यापासून व्यावसायिक पातळीवर नरकासुराचे मुखवटे तयार करण्यात येतात. मात्र, कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती (Ganesh idol from paper pulp) घडविणारे माशे येथील मनोज प्रभुगावकर काणकोणातील (Cancona Goa) एकमेव गणेश मूर्तिकार आहेत.

काणकोणातील काही कुटुंबांत चिकणमातीपासून तयार केलेल्या मूर्ती पुजण्याची परंपरा नाही. त्यांच्या घरी रानावनातील पाने, फुले आणून त्याची पूजा केली जाते. त्याला ‘पत्रीचा गणपती’, असे नामाभिधान आहे. मात्र, कागदावर रेखाटलेल्या गणपतीला पूजेत स्थान आहे. त्या कुटुंबांपैकी काहींनी पाच-सहा वर्षांपूर्वी मनोज प्रभुगावकर यांना कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती तयार करून देण्याची गळ घातली. मनोज यांनीही आपले सर्व कसब पणाला लावून कागद्याच्या लगद्यापासून गणेश मूर्ती तयार करण्याचे आव्हान स्‍वीकारले व सुबक मूर्ती तयार केल्या. या मूर्ती वजनाने हलक्या हाताळण्यासही सोयीस्कर यामुळे चिकणमातीच्या मूर्ती पुजणाऱ्या गणेश भक्तांकडूनही कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींना मागणी येऊ लागली. मात्र, पूर्वापार चिकणमातीच्या मूर्ती पुजणाऱ्या गणेशभक्तांच्या मूर्तीवर चिकणमाती हवीच, असा धार्मिक संकेत असल्याने गणेशाच्या हातावर चिकणमातीचा मोदक किंवा कोणत्याही स्वरूपात चिकणमाती वापरण्यात येते.

Goa: Manoj Prabhugaonkar With Son.
Goa: भाजपच्या जुमला सरकारवर जनतेचा विश्वास नाही; दिगंबर कामतांचे टीकास्त्र

अशी असते प्रक्रिया

चिकणमातीपासून गणेश मूर्ती साकारणे सोपे असते, मात्र कागदाच्या लगद्यापासून मूर्ती घडविण्यासाठी आधी चिकणमातीची मूर्ती बनवावी लागते. त्यानंतर कागदाच्या लगद्याचे थर नैसर्गिक गोंदाचा वापर करून चढवावे लागतात. फेव्हिकॉल किंवा अन्य कृत्रिम गोंद वापरल्यास कालांतराने मूर्ती आकुंचन पावते, असे मूर्तिकार मनोज प्रभुगावकर यांनी सांगितले. यंदा कागदाच्या लगद्यापासून १६ गणेशमूर्ती बनवून त्या रंगविण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे ते म्‍हणाले. गणेशमूर्ती हलक्या व हाताळण्यास सोप्या व्हाव्यात यासाठी नैसर्गिक साधने वापरण्याचा प्रयोग करण्यात येतो. त्यासाठी यंदा सुकलेल्या गोवऱ्याची पावडर चिकणमातीत मिसळून गणेशमूर्ती तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. त्‍यामुळे गणेशमूर्तीचे वजन सुमारे ५० टक्क्यांनी कमी होते, असे त्यांनी सांगितले.

Goa: Manoj Prabhugaonkar With Son.
Goa: पेडे हॉकी स्टेडियमला ध्यानचंद यांचे नाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com