Goa Prostitution Racket Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: वेश्याव्यवसाय प्रकरणी धाडसत्र सुरूच! अजून एकजण हणजूणे पोलिसांच्या ताब्यात

सदर आरोपी एका ग्राहकाला मुलगी पुरवण्यासाठी आला असताना त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले.

दैनिक गोमन्तक

Goa Prostitution Racket: राज्यात वाढलेल्या वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून यामध्ये गुंतलेल्या आरोपींना अटक करण्याचे सत्र गोवा पोलिसांनी हाती घेतले आहे.

म्हापशाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (8 जुलै) कळंगुटमध्ये छापा टाकण्यात आला आणि एका आरोपीला हणजूणे पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी एका ग्राहकाला मुलगी पुरवण्यासाठी आला असताना त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले.

आरोपीचे नाव दीपू यादव (वय 25) तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो कळंगुटमधील फुटबॉल ग्राउंड जवळील रिसॉर्ट डी क्रॉसरोडजवळ पोलिसांच्या सापळ्यात अडकला.

त्याच्यावर कलम 370 (A) IPC अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी ग्राहकांना मुलींचा पुरवठा करत असून त्यातून होणाऱ्या कमाईवर गुजराण करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात सुटका करण्यात आलेल्या पीडित मुलीला सुरक्षिततेसाठी संरक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. उत्तर गोव्याचे एसपी शिवेंदू भूषण आयपीएस आणि एसडीपीओ जीवबा दळवी यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

Cricketer Banned: टी-20 स्पर्धेदरम्यान कोकेनचे सेवन, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डोप टेस्टमध्ये फसला; क्रिकेट खेळणाऱ्यावर बंदी

Jharkhand Accident: झारखंडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकनं लोकांना चिरडलं; 3 महिला, 3 बालकांसह 7 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

SCROLL FOR NEXT