Van Mahotsav Day : वन महोत्सवात लडाखवासीयांचा सहभाग

पर्यावरण जतन करा : सेक्युअर हिमालयीन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा गौवा दौरा
Van Mahotsav Day
Van Mahotsav DayDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद पंचायत मंडळातर्फे आज, शुक्रवारी पंचायत कार्यालयाच्या परिसरात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लडाख केंद्रशासित प्रदेशच्या सेक्युअर हिमालयीन प्रकल्पाचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी सरपंच प्रीतल फर्नांडिस, पंच फातिमा रॉड्रिग्स, लडाख केंद्रशासित प्रदेशच्या सेक्युअर हिमालयीन प्रकल्पाचे अधिकारी तनुज नागपाल, स्तानझीन नामदोल, पाल्जेस आंगमो, त्सेतन दोरजाई, सलीम रझा, फरिदा बानो, थिनलेस आंगमो, सोनम तारगैस, त्सरिंग दावा, त्सैरींग चोसडोन, विनय तुबकी, शाबा नाईक गावकर, नारायण देसाई, दामोदर च्यारी, सूरज नाईक गावकर, शिरीष पै, विनोद फळदेसाई, संजील नाईक गावकर, प्रकाश फळदेसाई आणि मान्यवर उपस्थित होते.

Van Mahotsav Day
Goa News : पुराच्या भीतीने खांडेपार बंधाऱ्याला विरोध; सोनारबाग,उसगाव ग्रामस्थ आक्रमक

यावेळी प्रकल्प अधिकारी तनुज नागपाल, स्तानझीन नामदोल, पंचसदस्य फातिमा रॉड्रिग्स यांच्या हस्ते वडाचे रोपटे पंचायत कार्यालयामागे लावण्यात आले. सुरुवातीला सरपंच फर्नांडिस यांनी स्वागत केले, तर फातिमा रॉड्रिग्स यांनी आभार मानले.

Van Mahotsav Day
Goa News - मंत्री सुभाष फळादेसाईनी केली हळर्ण किल्ल्याची पहाणी | Gomantak TV

वृक्षच मनुष्याचे तारणहार

यावेळी सरपंच प्रीतल फर्नांडिस म्हणाल्या, की झाडेच माणसाचे तारणहार आहेत. माणसांच्या भल्यासाठीच झाडांची निर्मिती झाली आहे. मात्र, या झाडांची माणूसच निर्दयीपणे हत्या करत आहे. त्यामुळे केवळ झाडे लावून उपयोग नाही, तर ती जगवलीही पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com