Morjim : Work is underway to set up a separate power divisional center to solve the power problem.
Morjim : Work is underway to set up a separate power divisional center to solve the power problem. Dainik Gomantak
गोवा

Morjim Power Outage : विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; वीजप्रवाह सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघाडच

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी : 200 कोटी रुपये खर्च करून मांद्रे मतदारसंघातील वीज समस्या सोडवण्यासाठी भूमिगत वीज केबल आणि स्वतंत्र वीज विभागीय केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

भूमिगत वीज केबल घातल्यानंतर वीज भूमिगत होते की काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत. तासन्‌तास वीज गायब होण्याचा प्रकार मांद्रे मतदारसंघातील किनारी भागाबरोबरच इतर परिसरात घडत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत.

रोजच वीजप्रवाह खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. वीजप्रवाह सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. शुक्रवार, 26 रोजी रात्री वीज गायब झाली होती. यासंदर्भात वीज अभियंत्यांना संपर्क केला असता वीज अभियंते म्हणतात, वीस थेट थिवी येथून गेली तर काही वेळाने म्हणतात वीज केबलमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. वीज गायब होण्याचे नेमके कोणतं कारण आहे? याचा पत्ताच लागत नाही.

तीन तासांनंतर वीज आल्यानंतर परत शनिवार, 27 रोजी वीज गायब झालीच. शिवाय रविवार, 28 रोजी मॉन्सूनपूर्व कामे करण्यासाठी दुरुस्तीच्या नावाखाली सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वीज खंडित करण्याची प्रक्रिया वीज खाते करणार आहे. या डोकेदुखीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अचानक वीज गायब होत असल्याने विद्युत उपकरणांवर त्याचा परिणाम होतो.

कंत्राटदाराचे मनमानी काम

मांद्रे मतदारसंघातील विजेची समस्या सोडवण्यासाठी मांद्रे मतदारसंघात भूमिगत वीज केबल घालण्याचे काम कंत्राटदाराने योग्य पद्धतीने केलेले नाही. अर्धाअधिक रस्ता मधोमध खणून रस्ताही धोकादायक स्थितीत बनवला आहे. भूमिगत वीज केबल घातल्यानंतर विजेची समस्या तीव्रतेने जाणवते आहे.

1912 क्रमांक कशासाठी?

वीज खात्याने जर विजेची समस्या असेल तर वीजग्राहकाने 1912 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. परंतु या क्रमांकावर संपर्क साधला असता हा नंबर लागतच नाही. हा नंबर कशासाठी, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करत आहेत. सुरुवातीला या क्रमांकावर संपर्क केला तर लगेच फोन घेऊन समस्या ऐकली जायची. परंतु हल्ली संपर्कही होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT