Morjim Construction : पेडणे प्रशासकीय पालिका इमारतीची आमदार आर्लेकर यांच्याकडून पाहणी

पेंडणे पालिका क्षेत्रातील पेडणे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील काम सध्या संथगतीने सुरू आहे.
MLA Pravin Arlekar
MLA Pravin ArlekarGomantak Digital Team
Published on
Updated on

Morji Construction : पेडणे पालिका क्षेत्रातील पेडणे पालिका प्रशासकीय इमारतीचे पहिल्या टप्प्यातील काम एकूण 8 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे. याचे बांधकाम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कामाला विलंब झालाच.

शिवाय इमारतीच्या बाजूला संरक्षक भिंत उभारण्याऐवजी कंत्राटदाराने थेट इमारतीला जोडूनच संरक्षक भिंत उभारलेली आहे. भविष्यात याच बाजूला सरकारी कॉम्प्लेक्स इमारत आहे. त्या इमारतीलाही धोका संभवतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बांधकामाची नुकतीच पाहणी करण्यात आली.

MLA Pravin Arlekar
Morjim कुणाच्या म्हशी अन् कोण काढतो उठाबशी !

स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, सुडाचे अधिकारी, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेविका राखी, कशालकर, नगरसेवक शिवराम तुकोजी आदी उपस्थित होते.

पेंडणे पालिका क्षेत्रातील पेडणे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील काम सध्या संथगतीने सुरू आहे. हे काम मागच्या वर्षी पूर्ण व्हायला हवे होते. ते पूर्ण झाले नाही. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे या इमारतीचे काम वर्षभर लांबणीवर पडले. कंत्राटदाराला सरकारने एका वर्षाची मुदतवाढ केली आहे.

MLA Pravin Arlekar
Morjim : व्यावसायिकांच्या सोयीसाठीच मोरजीमध्ये भू-रूपांतर : काँग्रेस

परंतु ही मुदत वाढत असतानाही हातावर मोजता येणारे कामगार घेऊन कंत्राटदार काम करत आहेत. शिवाय संरक्षक भिंत इमारतीच्या काही मीटर अंतरावर उभारण्याऐवजी थेट इमारतीलाच जोडून संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सुडाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

आमदार प्रवीण आर्लेकर या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत असताना संरक्षक भिंत नसल्यामुळे नाराज झाले. त्यांनी सुडाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना या इमारतीला संरक्षण देणारी भिंत कुठे आहे? असा सवाल केला असता सुडाच्या अधिकाऱ्याने भिंतीला जोडूनच संरक्षक भिंत असल्याचे सांगितले. कंत्राटदाराने मनमनी पद्धतीने काम केले आहे. याविषयी आपण सरकारकडे चर्चा करणार असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले.

MLA Pravin Arlekar
Morjim News : मांद्रे देवी सातेरी, परिवार पंचायतनचा आज वर्धापनदिन

संरक्षक भिंत जर शासकीय इमारत आणि नवीन पालिका प्रशासकीय इमारतीच्या मधोमध नसेल तर भविष्यात सरकारी कॉम्प्लेक्स प्रकल्पालाही धोका संभवू शकतो. दरड कोसळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

- प्रवीण आर्लेकर, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com