Post Monsoon Rain Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Post Monsoon Rain Goa: 2025 च्या उत्तरार्धात गोव्यात झालेल्या अनपेक्षित आणि मुसळधार परतीच्या पावसाने राज्याच्या कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले.

Manish Jadhav

पणजी: 2025 च्या उत्तरार्धात गोव्यात झालेल्या अनपेक्षित आणि मुसळधार परतीच्या पावसाने राज्याच्या कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले. ऐन कापणीच्या हंगामात आलेल्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 कृषी परिमंडळांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला. कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या नैसर्गिक आपत्तीचा फटका राज्यातील सुमारे 4165 शेतकऱ्यांना बसला असून, एकूण 872.05 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. या संपूर्ण नुकसानीचा अंदाजित आकडा 4.94 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला.

राज्यातील विविध भागांतील नुकसानीचा आढावा घेतला असता, म्हापसा कृषी परिमंडळात नुकसानीची व्याप्ती सर्वाधिक असल्याचे दिसून आली. म्हापसा विभागात 1251 शेतकरी बाधित झाले असून तब्बल 459.53 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. मात्र, आर्थिक नुकसानीचा विचार केला असता डिचोली (Bicholim) तालुका राज्यामध्ये अग्रस्थानी आहे. डिचोलीतील शेतकऱ्यांना 1.27 कोटी रुपयांचा प्रचंड आर्थिक फटका बसला असून ही आकडेवारी राज्यातील इतर कोणत्याही परिमंडळापेक्षा जास्त आहे. प्रामुख्याने बागायती आणि नगदी पिकांच्या नुकसानीमुळे डिचोलीतील शेतकरी हवालदिल झाला.

त्याचवेळी, दक्षिण गोव्यातील (South Goa) परिस्थितीही काही वेगळी नाही. काणकोण आणि केपे यांसारख्या तालुक्यांनाही पावसाचा मोठा तडाखा बसला. या भागातील अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे काढणीला आलेले भात पीक कुजले. काही भागात पावसाची तीव्रता थोडी कमी असली, तरी आर्द्रतेमुळे पिकांवर कीड पडल्याने उत्पादनात मोठी घट झाली. राज्यातील 13 कृषी परिमंडळांपैकी काही भागात कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले असले तरी, एकूणच गोव्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला या पावसाने मोठी खीळ बसली.

कृषी तज्ज्ञांच्या मते, पावसाच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे आणि हवामान बदलामुळे ही परिस्थिती उद्भवली. ऐन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या या अतिवृष्टीने केवळ भातशेतीच नव्हे, तर केळी, सुपारी आणि इतर फळबागांचेही नुकसान केले. कृषी विभागाने आता नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता सरकारकडून मिळणारी मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी किती पुरेशी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

SCROLL FOR NEXT