Goa Rain: काणकोणला अवकाळी पावसाचा दणका! अचानक आलेल्या सरींनी नागरिकांची धावपळ; विद्यार्थ्यांचीही उडाली धांदल VEDIO

Unseasonal Rain Canacona: काणकोणात सोमवारी (21 नोव्हेंबर) दुपारच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शाळेतून घरी परतणाऱ्या मुलांची धांदल उडाली.
Unseasonal Rain Canacona
Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोणात सोमवारी (21 नोव्हेंबर) दुपारच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शाळेतून घरी परतणाऱ्या मुलांची धांदल उडाली. दुपारच्या जेवणासाठी घरी जाणाऱ्या नागरिक आणि शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांची निवारा शोधण्यासाठी लगबग दिसून आली. साधारणतः नोव्हेंबर महिन्यात गोव्यात पावसाचे प्रमाण कमी होते, मात्र हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे सोमवारी दुपारच्या वेळी काणकोण आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

नागरिकांची धावपळ

शाळेची वेळ संपल्यानंतर अनेक विद्यार्थी (Student) घरी परतत होते, त्याचवेळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी रस्त्याच्या कडेला किंवा दुकानांच्या शेडखाली आसरा घेण्यासाठी धावले. तसेच, कामावरुन दुपारचे जेवण करण्यासाठी घरी जाणाऱ्या लोकांचीही या पावसामुळे गैरसोय झाली. अनेकजण ओलेचिंब झाले, तर काहींनी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतला. अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर अचानक गर्दी वाढली आणि काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

Unseasonal Rain Canacona
Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

या अवकाळी पावसाने (Rain) येथील नागरिकांना दिलासा देण्याऐवजी गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आणि त्यांना निवाऱ्यासाठी तातडीने धावपळ करावी लागली. हवामानात होत असलेल्या या बदलामुळे स्थानिकांना आश्चर्य वाटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com