Sanjay School Porvorim Dainik Gomantak
गोवा

Sanjay School Porvorim: दिव्यांग जखमी प्रकरणाची दखल, आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसह संजय केंद्र, शिक्षण खात्याला नोटीस

घटनेमुळे व्यावसायिक केंद्र व उच्च माध्यमिक संजय केंद्राचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjay School Porvorim पर्वरी येथील जुन्या ‘एससीईआरटी’ची इमारत धोकादायक असल्याने तेथील व्यावसायिक केंद्र तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संजय केंद्र स्थलांतर करण्याची शिफारस आठ महिन्यांपूर्वीच केली होती.

येथे दिव्यांग मुलांना धोका पोहोचू शकतो, असेही स्पष्ट करूनही शिक्षण खाते व संजय केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले. संजय स्कूलच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरून पडून दिव्यांग गंभीर जखमी झाल्याच्या घटनेची स्वेच्छा दखल राज्य दिव्यांगजन आयोगाने घेतली आहे.

त्यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांसह संजय केंद्राचे वरून सदस्य सचिव आणि शिक्षण संचालकांना आज (शुक्रवारी) नोटीस बजावली

आयुक्तांनी २७ जानेवारी २०२३ रोजी जुन्या एससीईआरटी इमारतीला भेट दिली होती. त्यावेळी ही इमारत जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले होते.

कोणतीही दुर्घटना घडून विद्यार्थ्यांना दुखापत होऊ शकते किंवा अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे केंद्राचे स्थलांतर करण्याच्या शिफारस केली होती.

या घटनेमुळे व्यावसायिक केंद्र व उच्च माध्यमिक संजय केंद्राचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिव्यांगांचे पालकही या इमारतीमध्ये मुलांना पाठवण्यास घाबरत आहेत.

त्यामुळे हे स्थलांतर कऱण्यास संजय स्कूल व्यवस्थापन तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलावीत, अशी शिफारस करण्यात येत आहे. काही सरकारी इमारती राहण्यायोग्य नाहीत.

त्यामुळे या इमारतीत वावरणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अशा सरकारी इमारतींची संबंधित विभागाकडून देखभाल न केल्याबद्दल चौकशी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

सिडनीच्या औषधोपचारासाठी मदत द्या!

संजय स्कूल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असलेल्या सिडनी डिसोझा या दिव्यांग तरुणाच्या वैद्यकीय उपचाराकडे लक्ष देण्याची तसेच औषधे व उपचारासाठी मदत देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना

हे केंद्र तात्पुरते पर्वरी येथील आपत्कालीन निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस करताना जीर्ण व धोकादायक इमारतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही वा खबरदारीचे कोणतेही उपाय योजले नाहीत.

त्यांच्या या दुर्लक्षामुळे व वेळीच उपाययोजना न केल्यामुळे दिव्यांग तरुण पडून जखमी झाल्याची घटना घडली, असे राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर यांनी नोटिसीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT