Sanjivani Sugar Factoryबाबत मुख्यमंत्रांची खुशखबर, लवकरच संजीवनी साखर कारखाना पीपीपी तत्त्वावर...

मुख्यमंत्री : कर्मचारी भरती आयोगामार्फत
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Sanjivani Sugar Factory धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी तत्त्वावर) पुन्हा सुरू केला जाणार आहे.

त्यासाठी लवकरच देकार मागवण्यात येतील. राज्य सरकारमधील कर्मचारी भरती येत्या ऑक्टोबरपासून कर्मचारी भरती आयोगाकडून स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून केवळ गुणवत्तेवर आधारित घेतली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्यभरातील अनेकांनी दूरदर्शनवरील ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली. उंडीर येथील मलनिस्सारण प्रकल्पासंदर्भात चर्चेसाठी दोन दिवसांत भेटीसाठी वेळ देईन, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांनी सांगितले, साखर कारखाना सरकारला बंद करायचा नाही. तो खासगी भागीदारीतून चालवण्याचा विचार आहे. सरकारी नोकरी हवी असे सर्वांना वाटणे साहजिक आहे. खासगी क्षेत्रातही अनेक संधी आहेत.

औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगारसंधी गोमंतकीय युवा वर्गाने न स्वीकारल्याने शेजारील राज्यातील युवा वर्गाने त्या संधी घेतल्या. आता मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली आहे.

त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या अनेक जागा गोमंतकीय युवक युवतींनी घेतल्या आहेत. सरकारच्या विविध खात्यातही कर्मचारी भरती केली जाणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून केवळ गुणवत्तेवर आधारीत ही भरती असेल.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: उंडिर येथील एसटीपी प्रकल्प गरजेचा; स्थानिकांशी चर्चा करू

चतुर्थीपूर्वी पैसै

राज्य सरकारतर्फे जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांची थकीत रक्कम लाभार्थ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी म्हणजे 15 सप्टेंबरपूर्वी मिळेल.

चतुर्थीचा सण लाभार्थ्यांना चांगल्या पद्धतीने साजरा करता यावा, त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यादृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ‘एलपीजी सिलिंडर रिफिलिंग योजना 2023’साठी आर्थिक साहाय्य देण्याच्या योजनेस प्रारंभ करण्यात आला.

CM Pramod Sawant
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा उत्तर गोवा-पणजीतील किमती

यावेळी अंत्योदय योजनेतील लाभार्थींना मुख्यमंत्र्यांनी मंजुरीपत्राचे वितरण केले. व्यासपीठावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक, खात्याचे सचिव संजित रॉड्रिग्स आणि संचालक गोपाळ पार्सेकर उपस्थित होते. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अर्थसाहाय्य योजनेसाठी नव्याने अर्ज केलेल्यांचेही आणि प्रलंबित मंजुरी राहिलेल्यांचे अर्ज निकाली काढले जातील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांचे कौतुक केले.

CM Pramod Sawant
Goa Crime Case: राज्य हादरलं! प्रेमप्रकरण, सुडाच्या भावनेने दोघांचे मुडदे; गोवा बनतोय ‘मर्डर डेस्टिनेशन’

श्रीपाद नाईक यांनी अशा उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणाला गती देण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आर्थिक साहाय्य योजना गोव्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 12 तालुक्यांतील 60 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे प्रदान करण्यात आली. प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले. संजित रॉड्रिग्स यांनी स्वागत केले, तर संचालक पार्सेकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com