Goa Murder:  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder: घनदाट जंगलात आढळला 'त्या' तरूणीचा मृतदेह

प्रियकराने निर्घृण खून केल्याने राज्यात खळबळ

गोमंतक ऑनलाईन टीम

Porvorim Girl Murder Followup : पर्वरीतील कामाक्षी या तीस वर्षीय तरूणीचा प्रेम प्रकरणातून माजी प्रियकरानेच निर्घूण खून केल्याची घटना उघड झाल्यावर राज्यात खळबळ माजली आहे. गेल्या तीन दिवसातील राज्यातील ही खूनाची पाचवी घटना आहे.

कामाक्षीचा माजी प्रियकर असलेल्या प्रकाश चुंचवाड (वय 22) यानेच हा खून केल्याचे समोर आले आहे. त्याने कामाक्षीचा खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकला होता. म्हापसा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत खूनाची माहिती मिळाल्यानंतर आज, शुक्रवारी सकाळीच पोलिसांचे फॉरेन्सिक पथक आंबोलीच्या दिशेने रवाना झाले होते. पोलिसांनी प्रकाश चुंचवाड याला अटक केली आहे. दुपारी चुंचवाड याच्या माहितीनुसार मृतदेहाचा शोध घेतला जात होता. काही वेळाच्या शोधानंतर पोलिसांना मृतदेह सापडला.

दोन दिवसांपुर्वी कामाक्षी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटूंबियांनी पोलिसात केली होती. त्यांनी पर्वरीत गॅरेज चालवणाऱ्या प्रकाश चुंचवाड याच्यावर संशय व्यक्त केला होता. दरम्यान, खुनाच्या काही तास आधी कामाक्षी हीने म्हापसा पोलिसात तिच्यावर हल्ला झाल्याची तक्रार केली होती.

दरम्यान, मृतदेह रस्त्याकडेला झाडीत फेकला गेला होता. जंगल असल्यामुळे याबाबत कुणालाही काहीही संशय आलेला नव्हता. मृतदेह काढताना येथे बघ्यांची बरीच गर्दी जमली होती. तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता तो उत्तरीय तपासणीसाठी गोव्यात आणण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Ration Card Suspension: गोव्यात रविवारपासून 'या' रेशनकार्डांना बसणार तात्पुरती टाळेबंदी; ई-केवायसीनंतर पुन्हा सक्रिय

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

SCROLL FOR NEXT