Goa News | PFI Dainik Gomantak
गोवा

Goa News: तपासकामात अडथळा आणल्याने 'PFI'च्या अल्ताफवर गुन्हा नोंद

Goa News: बेळगावचे आयकर खात्याचे उपसंचालक अमित शिंदे यांनी सायबर गुन्हे कक्षाकडे तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला (पीएफआय) आर्थिक मदत करत असल्याप्रकरणी संशय असलेल्या फातोर्ड्यातील अल्ताफ सय्यद हा तपासकामात सहकार्य करत नसल्याप्रकरणी तसेच अडथळे आणत असल्याबद्दल बेळगावचे आयकर खात्याचे उपसंचालक अमित शिंदे यांनी सायबर गुन्हे कक्षाकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या खात्याच्या अधिकाऱ्यानी काही दिवसांपूर्वी दक्षिण गोव्यात छापे टाकले होते.सायबर गुन्हे कक्षाकडे दाखल केलेल्या तक्रारीत संशयित सय्यद हा चौकशीसाठी त्याचा मोबाईल देण्यास तयार नाही. त्याने त्यामध्ये असलेले पुरावेही नष्ट केले आहेत. त्याच्या कारवाया या संशयास्पद आहेत.

सरकारी कामात अडथळा आणत आहे. तो पीएफआयचा सदस्य असल्याने या संघटनेला तो गुप्तपणे आर्थिक मदत करत आहे. गेल्या 19 ऑक्टोबरला त्याच्या फातोर्डा येथील घरावर आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला, तेव्हा त्याने अधिकाऱ्यांना त्यांचे काम करण्यास अडथळा आणला.

व्यवसायासाठी वापरत असलेला मोबाईलही त्याने देण्यास नकार दिला. तसेच मोबाईलचा पासवर्डही दिला नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संशयित अल्ताफ सय्यद याच्या कारवाया संशयास्पद असून तो कटकारस्थान रचून देशद्रोहाचा ठपका असलेल्या पीएफआयला आर्थिक मदत करत आहे.

तसेच, देशाच्या काळ्या पैशाच्या मनी लॉँडरिंगमध्येही गुंतला आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला त्याच्या या कारवाया धोकादायक आहेत. त्याने त्याच्याकडील सर्व पुरावे नष्ट केले आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी सायबर गुन्हे कक्षाचे अधिकारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT