Goa News: गोव्यात विद्यार्थ्यांनी दिले कचरा व्‍यवस्‍थापनाचे धडे!

Goa News: विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमोर 'कचरा व्यवस्थापन' या विषयावर प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
Goa News | Waste Management
Goa News | Waste ManagementDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: गोव्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम हा 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्याचाच पुढील स्तर म्हणजे ‘एनहान्सिंग सिविक एंगेजमेंट’ हा अभ्यासक्रम इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या मुलांना 2022- 23 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येत आहेत. (Goa News)

दरम्यान, त्यात प्रयोगशील शिरगाव सरकारी प्राथमिक शाळेचाही सहभाग होता. विशेष म्‍हणजे, यावेळी शालेय मुलांनी उपस्‍थित पालक, शिक्षकांसमोर ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर प्रभावीपणे मार्गदर्शन केले.

Goa News | Waste Management
Rajani Bhembre Passed Away : ज्येष्ठ कोकणी लेखिका रजनी भेंब्रे यांचं निधन

उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ''कचरा व्यवस्थापन'' , वैयक्तिक स्वच्छता'' हा अभ्यासक्रम विज्ञान आणि समाजशास्त्राच्‍या माध्‍यमातून तर ''रस्ता सुरक्षा आणि जागरूकता हे शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत शिकविण्यात येणार आहेत.

त्यासाठी सर्व तालुक्यांतील उपक्रमशील माध्यमिक शिक्षक - शिक्षिका यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पर्वरी येथे प्रशिक्षण देऊन त्यांच्‍या अन्‍य शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.

यावेळी मुख्याध्यापिका योगिता देशपांडे , सुमिता फडते, जागृती नाईक, एडीइआय लीना कळंगुटकर, मूल्यवर्धन समन्वयक सचिन सुतार, मास्टर रिसोर्स पर्सन पाऊला डिसोझा, ऋचा हळदणकर, आदित्या सुर्लकर, नाझनिन शेख, सेजल हिंदे आदींची उपस्‍थिती होती.

Goa News | Waste Management
Goa First: गोवा शिपयार्डची 'ती' भिंत हटवणे आवश्यक

उपस्‍थित भारावले

श्रीनिश एकनाथ हडफडकर म्हणाला, ‘आमची शिरगावची जत्रा खूप प्रसिद्ध आहे. खूप भाविक जत्रेला येतात. म्हणून आम्ही मुलं, शिक्षक आणि पालकांनी मिळून वर्तमानपत्राच्या(रद्दी) कागदी पिशव्या तयार केल्या आणि सगळ्या दुकानदारांना विनामूल्य वाटल्या. हे ऐकून सर्व उपस्थित माध्यमिक शिक्षक, प्रशिक्षक भारावून गेले.

लोकसहभाग वाढला

इसीइ हा विषय शाळेत राबवल्यानंतर केलेल्या वेगवेगळया उपक्रमशील प्रयोगांची फोटो व व्हिडिओ सहित सविस्तर माहिती दिली आणि या कार्यक्रमामुळे कसा लोकसहभाग वाढला, याचे अनुभव सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com